Preview attachment DSC_1538.JPG अहिल्यानगर : अहमदनगर भूलतज्ञ संघटना अहिल्यानगरच्या अध्यक्षपदी डॉ राहुल एरंडे व सचिवपदी डॉ सचिन उदमले यांची निव
Preview attachment DSC_1538.JPG
अहिल्यानगर : अहमदनगर भूलतज्ञ संघटना अहिल्यानगरच्या अध्यक्षपदी डॉ राहुल एरंडे व सचिवपदी डॉ सचिन उदमले यांची निवड करण्यात आली असून .अहिल्यानगर येथे भूलतज्ञ संघटनेच्या झालेल्या पदग्रहण समारंभात भारतीय भूलतज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बालावेंकट सुब्रमण्यीन (कोयम्बटूर), महाराष्ट्र भूलतज्ञ संघटनेचे सचिव डॉ. राजेश तगडपल्ले , महाराष्ट्र कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष डॉ. मिलिंद पोळ व आय एम ए अहिल्यानगर चे अध्यक्ष डॉ. सी डी मिश्रा ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष ,उपाध्यक्ष , सचिव व नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. याप्रसंगी नीमा करकमकर ,नगर शहर व परिसरातील अनेक नामवंत डॉक्टर्स उपस्थित होते.
उपाध्यक्षपदी डॉ अश्विनी शिंदे, सहसचिव डॉ अंजली राऊत, खजिनदार डॉ विनय छल्लानी यांची निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. सुभाष तूवर ह्यांनी मागील वर्षी संघटनेने वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देत ताळमेळ प्रस्तुत केले. याप्रसंगी भारतीय भूलतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ बालावेंकट मार्गदर्शन करताना म्हणाले की जागतिक पातळीवर आपन जे काम ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात करत आहोत. त्या कामाचे ‘पेपर प्रेझेंटेशन’ करायला हवे”.प्रत्येकाने वेगवेगळ्या परिसंवादात, परिषदमध्ये भाग घेऊन नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे व त्याचा उपयोग आपल्या आपल्या रूग्णांना करून द्यायला हवा . आपण केलेल्या कामाचे डॉक्युमेंटेशन” आपल्याजवळ असायला हवे.” रिसर्च “मध्ये योगदान देऊन “भारताचे नाव जागतिक पातळीवर” नेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करण्याचे आव्हान करत भुलतज्ञांनी ऑपरेशन करताना व त्यानंतर देखील रुग्णाची काळजी कशी घेऊ शकतात ह्या बद्दल मार्गदर्शक केले. दिवंगत भूलतज्ञ डॉ. करमकर यांनी केलेल्या कामांची माहिती यावेळी त्यांनी दिली. डॉ श्रीकांत मोने ह्यांनी डॉ करकमकर ह्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ नवीन भूलतज्ञ ज्यांनी “परीक्षेत विशेष प्रावीण्य” मिळविले आहे त्यांना मेडल व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. नांदेड येथील महाराष्ट्र राज्य भूल तज्ञ संघटनेचे सचिव डॉ राजेश तगडपल्ले यांनी नवीन कार्यकारिणी ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. राज्य कार्यकारिणी कडून सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ दिपाली फाळके, जी सी मेंबर डॉ सचिन लवांडे ,महाराष्ट्र कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष. डॉ मिलिंद पोळ ह्यांचे विशेष सहकार्य लाभले. नूतन कार्यकारिणीला डॉ बाळासाहेब बांडे, डॉ सतीश देशपांडे, डॉ श्रीकांत मोने, डॉ विजय सोनार ह्या मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अंजली राऊत व डॉ वैष्णवी लोहकरे यांनी केले. आभार अहमदनगर भूल तज्ञ संघटनेचे सचिव डॉ सचिन उदमले मानले.
COMMENTS