Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथरवट समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. अनिकेत गगे

उपाध्यक्षपदी नंदकिशोर टोरपे यांची निवड

कोपरगाव तालुका ः पाथरवट समाज सेवा मंडळ बेट कोपरगाव ची वार्षिक सर्वसाधारण सभा जेष्ठ सदस्य  रमेश गगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यात संचालक म

आदिवासी, पारधी कुटुंबीयांना फराळ, आकाश कंदील, पणत्या व मिठाईचे वाटप
Sangmaner : भाजपा युवा मोर्चाचे संगमनेर नगरपरिषदेमध्ये ठिय्या आंदोलन | LOKNews24
नागरिकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन

कोपरगाव तालुका ः पाथरवट समाज सेवा मंडळ बेट कोपरगाव ची वार्षिक सर्वसाधारण सभा जेष्ठ सदस्य  रमेश गगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यात संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध करीत खालील पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली  त्यात अध्यक्षपदी डॉ. अनिकेत विलास गगे, उपाध्यक्षपदी  नंदकिशोर बाळासाहेब टोरपे सचिव युवराज जयसिंग शेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संचालकपदी अशोक त्रंबक भगत, दीपक लक्ष्मण धुमाळ, विनोद चंद्रकांत मैलै, ओंकार संजय जाधव, गौरव चंद्रकांत केणे, ऋषीकेश शंकर धुमाळ यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी पाथरवट समाज सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष सुनिल भगत यांनी नुतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. एकनाथ गगे, काशिनाथ डोंगरे, बाळकृष्ण टोरपे, सदाशिव मैल, विलास गगे, प्रसाद धुमाळ, राहूल गगे, गौरव आमले, आबा गगे, चंद्रकांत केणे, रोहित गगे, शिवकिरण आमले, सचिन कुडके, रोहीत मैले, दिनेश डोंगरे आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

COMMENTS