Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. नितीन करीर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन  

अकोले ः अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर (भा.प्र.से.) यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा तसेच अकोले

शासकीय योजनांचा जत्रा कार्यक्रम घरोघर पोहचवा
जामखेडमध्ये व्यापार्‍यावर जीवघेणा हल्ला
‘योग दिना’ला कट्टरपंथीयांची दहशत; व्हिडीओ व्हायरल | LokNews24

अकोले ः अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर (भा.प्र.से.) यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा तसेच अकोले तालुक्याचे सुपुत्र. विजय चौधरी आणि अजित  देशमुख यांची ’सहसचिव पदी’ पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार समारंभ सोहळा शनिवार दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित केला आहे. अकोल्यातील मातोश्री लॉन्स, इंदोरी फाटा येथे आमदार डॉ. किरणजी लहामटे यांचे शुभहस्ते व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमास आमदार सत्यजीत तांबे, अगस्ति साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम पा. गायकर ज्येष्ठ शेतकरी नेते  दशरथराव सावंत, मधुकरराव नवले, विकासराव देशमुख, निर्मलकुमार देशमुख, सतिष देशमुख सुरेशराव कोते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन विवेक सोपानराव देशमुख, संदीप सोपानराव देशमुख, मनोज शिवनाथ देशमुख, शांताराम कारभारी चौधरी, किसन कारभारी चौधरी, शरद कारभारी चौधरी यांनी केले आहे.

COMMENTS