नाशिक प्रतिनिधी - हृदयविकारावर उपचार करत असतांना प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ.मनोज चोपडा यांनी हजारो रुग्णांना दिलासा दिलेला आहे. गुंतागुंत
नाशिक प्रतिनिधी – हृदयविकारावर उपचार करत असतांना प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ.मनोज चोपडा यांनी हजारो रुग्णांना दिलासा दिलेला आहे. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करतांना त्यांनी रुग्णांना नवजीवन दिले. त्यांनी आजवर केलेल्या ७० हजार शस्त्रक्रिया (इंटरव्हेशनल कार्डियाक प्रोसिजर) व वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या एकंदरीत योगदानाची दखल लंडन बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये घेण्यात आली आहे. या कामगिरीतून त्यांना विश्वविक्रम केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट आणि मॅग्नम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र, राज्य व देशभरातील रुग्णांवर उपचार करतांना डॉ.मनोज चोपडा यांनी रुग्णांना दिलासा दिलेला आहे. शिखरासारखी कामगिरी करतांना त्यांनी आता विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
गेल्या २८ वर्षांपासून डॉ.मनोज चोपडा यांनी आत्तापर्यंत ७० हजारहून अधिक शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत. यासोबतच १ लाखपेक्षा जास्त शाळकरी विद्यार्थ्यांचे इकोकार्डिओग्राम स्क्रीनिंग केले असून, यामुळे ३ हजारापेक्षा जास्त मुलांच्या हृदयाचे छिद्र बंद करतांना त्यांचे पुढील जीवन सुखकर केले आहे.
यापूर्वी अवघ्या २० तासांमध्ये ३९ शस्त्रक्रिया, वैद्यकीय प्रक्रिया राबवितांना त्यांनी राष्ट्रीय स्तरावर विक्रम नोंदविला आहे. नवजात शिशूंपासून तर आठ वर्षांपर्यंतच्या अशा एकूण १४ बालकांच्या हृदयाचे छिद्र बंद करण्याची शस्त्रक्रिया अवघ्या १२ तासांमध्ये करतांना त्यांनी विक्रमाला गवसणी घातली होती. आजवर ७५ क्लिनिकल ट्रायल्समध्ये सहभागी होतांना त्यांनी संशोधनाला प्रोत्साहन दिले आहे. यासोबत २० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये त्यांचे शोधप्रबंध प्रसिद्ध झाले आहेत.
आजवरच्या त्यांच्या थक्क करणार्या प्रवासातून डॉ.चोपडा यांचे त्यांच्या क्षेत्रातील समर्पणभाव, कुशल अनुभव, आणि हृदय विकाराच्या क्षेत्रात आरोग्य सुविधा उंचाविण्याचा त्यांचा ध्यास अधोरेखीत होते. सर्वोत्तम आणि आधुनिक उपचार सुविधा पुरविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा मोठे यश येते आहे.
डॉ.मनोज चोपडा यांनी प्रस्थापित केलेल्या या विक्रमाबद्दल आनंद साजरा करतांना या माध्यमातून अनेकांच्या जीवनात सकारात्मक परीणाम निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. तसेच या विक्रमामुळे आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांना निश्चितच बळ मिळणार आहे.
डॉ.मनोज चोपडा यांच्या कार्याचा धावता आढावा – वणीसारख्या आदिवासी बहुल गावात जन्मलेल्या व वाढलेल्या डॉ.मनोज चोपडा यांना अनेक मोठ्या शहरांमध्ये वैद्यकीय सेवा देण्याची संधी होती. परंतु ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या त्यांच्या ध्यासातून नाशिक विभागाच्या स्तरावर त्यांनी शहरात हॉस्पिटल सुरु केले. १९९५ मध्ये डॉ.चोपडा यांनी इंटरव्हेंशनल कार्डियालॉजीसाठी नाशिकची पहिली कॅथलॅप सुरु केली. त्यांचा हा निर्णय नाशिक विभागातील कार्डियाक केअर क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. तेव्हापासून आजवर त्यांनी विविध आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून, यामध्ये रोबोटिक ॲजिओप्लास्टी, आयव्हीयुएस, ओसीटी इमेजिंग, बायो ॲसार्जेबल स्टेंट्स उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात अवगत करुन दिले. आपल्या कारकीर्दीत डॉ.चोपडा यांनी विविध विक्रम प्रस्थापित केले असून, अनेकवेळा त्यांनी आपलेच विक्रम मोडीत काढतांना नवीन विक्रम नोंदविले आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासतांना डॉ.चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. विशेषतः ग्रामीण भागात आयोजित केल्या जाणार्या या शिबिरांमुळे तेथील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेतांना अमेरिकन कार्डियालॉजी जर्नल अवॉर्ड, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार, आयएमए नाशिक डिस्ट्रीक्ट अवॉर्ड व यांसारखे असंख्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात डॉ.चोपडा व त्यांच्या टीमने मॅग्नम हॉस्पिटलद्वारे महत्त्वाची भूमिका बजावली. या कालावधीत विविध माध्यमातून १० हजार रुग्णांनी आरोग्य सुविधेचा लाभ घेतला. त्याआधी २०१४-१५ मध्ये कुंभमेळ्याच्या कालावधीत डॉ.चोपडा यांनी आयएमए अध्यक्षपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळतांना, भाविकांना दर्जेदार आरोग्यसुविधा मिळतील, यासाठी काळजी घेतली. ‘हृदयरोग आणि आपण’ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून हृदयविकार असलेल्या रुग्णांना बरीच उपयुक्त माहिती उपलब्ध झालेली आहे.
COMMENTS