Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. काळे करतात आईच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत रूग्ण तपासणी

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील डॉ. विजय दादाहारी काळे हे सर्व परिचित असून जवळपासच्या  पाच ते सात गावाना ते आपली अविरतपणे

महानगरपालिकेवर काँग्रेसचा भव्य आसूड मोर्चा
मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचा लोकप्रतिनिधी नसल्याने उपोषण करण्याची वेळ:- क्षितिज घुले 
धक्कादायक, अपघातात अधिकाऱ्याचा मृत्यु | LOKNews24

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील डॉ. विजय दादाहारी काळे हे सर्व परिचित असून जवळपासच्या  पाच ते सात गावाना ते आपली अविरतपणे वैद्यकीय सेवा देत असतात  त्यांच्या आई श्रीमती छबूबाई दादाहरी काळे यांची आपला मुलगा डॉक्टर होऊन समाजातील गोरगरोब रुग्णांची सेवा करावी ही इच्छा होती तीच आईची इच्छा विजय काळे यांनी आपल्या अथक परिश्रम व हुशारीच्या जोरावर पूर्ण करत डॉक्टर होऊन शिंगणापूर येथे श्रद्धा हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून रुग्ण सेवा करत आहे.
डॉ. विजय काळे यांच्या आईचे 18 वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर संपूर्ण काळे कुटूंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. या दुःखातून सावरत डॉ. काळे यांनी आपण देखील समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने आईच्या निधनानंतर तब्ब्ल 18 वर्षांपासून  आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी आपल्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये आईच्या पुण्यतिथी दिनी दिवसभर येणार्‍या सर्व रुग्णांची मोफत तपासणी करत  त्यांना आरोग्यविषयक योग्य ते मार्गदर्शन करत असतात. त्याच अनुषंगाने डॉ. विजय काळे यांनी शनिवारी आपल्या आईच्या पुण्यतिथी दिनी साधारणपणे 70 पेक्षा अधिक रुग्णाची मोफत तपासणी करत आपल्या आईच्या आठवणीना उजाळा दिला आहे. डॉ. विजय काळे हे शिंगणापूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच असून त्यांना या उपक्रमास त्यांचा पत्नी शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या राजश्री काळे यांचे देखील मोलाचे सहकार्य असते.शिबीर यशस्वीतेसाठी दत्तात्रय चव्हाण, तुषार साळवे, नवनाथ कुर्‍हे यांनी अथक परिश्रम घेतले.

COMMENTS