Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जगदीश पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान 

नाशिक: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी
राज्यात टाळेबंदीत 15 दिवसांची वाढ
नागरिकांनी ’इलेक्ट्रिक’ वाहनांना प्राधान्य द्यावे : आदित्य ठाकरे

नाशिक: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक जगदीश पवार यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन 2019-20 ते 2022-23 मधील विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस येथे पार पडला. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, ज्ञानेश्वर म्हात्रे, भरत गोगावले, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुरस्कार महामानवांच्या नावाने देण्यात येत आहे. त्यांना यापुढे महामानवांच्या पुरस्कारार्थी नावाने ओळखण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच पुरस्कारार्थी व्यक्तींची जबाबदारी वाढली आहे.

दरम्यान, गेल्या तीन दशकांपासून नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात लाखो रुग्णांना उपचारार्थ मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे सामाजिक कार्य जगदीश पवार आजही करीत आहेत. त्यांच्या याच समाजसेवी वृत्तीमुळे त्यांना प्रभाग 22 च्या पोटनिवडणुकीत नागरिकांनी भरघोस मतांनी निवडून दिले. कोवीड – 19 काळातही जगदीश पवार यांच्या सामाजिक सेवेसह दातृत्वाची दखल प्रसारमाध्यमांतून चर्चिली गेली. रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासह विवक्षित आरोग्य सुविधांचा पुरवठा करण्यासाठी जगदीश पवार यांनी अथक परिश्रम घेतले. त्या प्रयत्नांची व प्रभागात केलेल्या विकासकामांची दखल घेत सामाजिक न्याय विभागाने त्यांच्या समाजसेवी कार्याचा पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान केला आहे. या पुरस्कारबद्दल विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करत जगदीश पवार यांचे अभिनंदन केले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि या देशातील सर्व महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत मी माझे सामाजिक कार्य आजवर केले आहे. मला मिळालेला हा पुरस्कार समाजातील प्रत्येक नागरिकाला मी समर्पित करत यापुढेही मोठ्या उमेदीने आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. महाराष्ट्र शासनाने या पुरस्कारासाठी माझी निवड केली, याबद्दल शासनाचे आभार. जगदीश पवार, माजी नगरसेवक, मनपा नाशिक.

COMMENTS