अहमदनगर ः अकोले तालुक्यातील कळंब येथे आदर्श गौतम सामाजिक तरूण मित्र मंडळ आणि समस्त गावकरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर या
अहमदनगर ः अकोले तालुक्यातील कळंब येथे आदर्श गौतम सामाजिक तरूण मित्र मंडळ आणि समस्त गावकरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंतीनिमित्त सकाळी महिला मेळावा, त्यानंतर शिवकृपा हॉस्पिटल आळेफाटा यांच्यावतीने मोफत तपासणी व रोगनिदान शिबीर घेण्यात आले. सायंकाळी महापुरूष यांच्या प्रतिमांची भव्य वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. नंतर सार्वजनिक सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. जयंती उत्सवात प्रमुख पाहुणे सिने अभिनेते गणेश कृष्णाजी वाघमारे यांना नाट्य व सिने सृष्टीतील विशेष योगदानाबद्दल पोलिस पाटील सुभाष लांडगे, कळंबचे तंटामुक्ती अध्यक्ष गुलाबराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य शोभाताई गायकर, शिवाजी गवांदे, संतोष मदने, माजी सरपंच बाळासाहेब देठे, बाळू देठे, यांना सन्मापत्र देवून गौरव करण्यात करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण देठे यांनी केले. बुद्धवंदना बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे, शांताराम देठे यांनी केली. यावेळी सरपंच उत्तम लांडगे, उपसरपंच शंकुतलाबाई खरात, भाऊसाहेब भोर, संतोष खरात, भरत जाधव, मनोज खरात, दिपक देठे, यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शांताराम देठे, सुभाष देठे, विनोद वाघमारे, सुनील खरात, गणेश गौदंके, जयकिसन देठे, दिगंबर देठे, शरद टपाल, प्रकाश देठे आदींनी परिश्रम घेतले.
COMMENTS