Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. उपाध्ये यांचे ’ह मानवा, निर्मिक तू’मधील मानव्य प्रेरणादायी ः शांताताई शेळके

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः माणूस हा जगाचा कर्ता धर्ता आहे. त्याने संस्कृती निर्माण केली. त्यानेच श्रद्धास्थाने आणि ज्ञानग्रन्थ निर्माण केले.माणूस जगा

नगरच्या श्रीविशाल गणपतीला चांदीची रत्नजडित अंगठी
राहुरी तालुक्यात ऊस पिकावर हूमणी अळीचा प्रादूर्भाव
2022 सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार -शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः माणूस हा जगाचा कर्ता धर्ता आहे. त्याने संस्कृती निर्माण केली. त्यानेच श्रद्धास्थाने आणि ज्ञानग्रन्थ निर्माण केले.माणूस जगाला जोडतो आणि तोडतोही त्यासाठी गोतावळारूप माणूसपण जपावे,ह जीवनसूत्र सांगणारे डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे ’ह मानवा, निर्मिक तू ’ह्या  पुस्तकातील मानव्यविचार प्रेरणादायी असल्याचे मत पंढरपूर येथील साहित्यिका शांताताई हनुमंत शेळके यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील वाचन संस्कृतीतर्फे श्रीरामपूर शिवाजीनगर भागातील शेळके हॉलमध्ये आयोजित केलेल्या पुस्तक परिसंवाद,स्त्रीसन्मान सोहळा, प्राचार्य टी. ई. शेळके सहश्चंद्रदर्शन सोहळाचर्चा, आजची कुटुंबसंस्कृती या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी लेखिका,  कवयित्री शांताताई शेळके बोलत होत्या.अध्यक्षस्थानी साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे होते. प्रारंभी संयोजक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून ’ह मानवा, निर्मिक तू ’या कवितासंग्रहाचे आशयविश्‍व विशद केले. प्राचार्य टी. ई. शेळके यांनी सर्व परिवाराचा परिचय करून देऊन माणूस ज्ञान आणि परिश्रमातून कसा उभा राहतो, ते सांगितले. कवियित्री संगीता फासाटे यांनी सर्व महिलांचा शाल, पुस्तके भेट देऊन सत्कार केले.डॉ. शिवाजी काळे यांनी सर्व मान्यवर पुरुषांचा सत्कार केले. यावेळी व्यकंटराव इराप्पा शेळके, शांता व्यकंटराव शेळके, हनुमंतराव इराप्पा शेळके, शांताताई हनुमंतराव शेळके, पुणे येथील सेवानिवृत्त उपभयंता सा.बां. विभागाचे बालाजी इरप्पा शेळके, कांता बालाजी शेळके, गोविंद इराप्पा शेळके, सुरेखा गोविंद शेळके,लातूरच्या डॉ. अलका रायभोगे, हिमांशु रायभोगे, श्रीमती रुक्मिणी सुडके, श्रीमती सत्यभामा डुकरे, विमल सुडके, डॉ. सौ. अर्चना संजय शेळके, सौ.अनिता चितळकर, माणिकराव चौधरी आदी उपस्थित होते. शांताताई शेळके यांनी परिवार आणि प्रेमजिव्हाळा यांचे महत्व सांगून  पुढे सांगितले की, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ’ह मानवा, निर्मिक तू’ह्या कवितासंग्रहातून माणसाचे दिव्यत्व आणि भवत्व सांगितले आहे.श्रम, ज्ञान, संस्कृती, लेखन, कुटुंबनीती ह्या पंचतत्वातून माणूसपण निर्माण केले. ते टिकले पाहिजे. युद्ध नको, विवेक हवा, असा विचार सांगणारे पुस्तक प्राचार्य टी. ई. शेळके यांच्या ज्ञानतपस्वी जीवनाला अर्पण केले, त्याबद्दल आनंद व्यक्त केला. संगीता फासाटे यांनी महिला सबलीकरण युगाची गरज सांगून आई कविता सादर केली. डॉ. शिवाजी काळे यांनी पूर्वीच्या संयुक्त कुटुंबसंस्कृतीचे महत्व सांगून शेळके, सुडके, चौधरी, रायभोगे परिवाराने हा आदर्श जपल्याबद्दल आनंद व्यक्त करून आपले कौंटुबिक अनुभव व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर संगीता फासाटे यांनी आभार मानले.

COMMENTS