Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्व प्रभागांमध्ये बाल संरक्षण समिती स्थापन करावी

 डॉ. गावित्रे यांचे कोपरगाव नगरपालिकेस निवेदन  कोपरगाव शहर : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण )अधिनियमानुसार महाराष्ट्र शासनाच्या २०१४ च्या परिपत्रकानुसार प्रत्येक प्रभागात बाल संरक्षण समिती स्थापन करणे हे बंधनकारक असल्याने या कायदेशीर बाबींचा विचार करून कोपरगाव शहरातील सर्व प्रभाग मध्ये या समितीची स्थापना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे यांनी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला केली आहे.  बालविवाह,बालमजुरी,अमली पदार्थाचे सेवन लैंगिक अत्याचार इत्यादीचे प्रमाण वाढत चालले असून मागील काही वर्षात कोपरगाव शहरांमध्ये अनेक अल्पवयीन मुला- मुलींनी आत्महत्या देखील  केलेल्या  आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी या समितीचा निश्चितच उपयोग होईल असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. या समितीचा अध्यक्ष हा नगरसेवक असून अंगणवाडी सेविका या सदस्य सचिव म्हणून काम पाहतात तसेच एक १८ वर्षे वयाची मुलगी व एक २१ वर्षाचा मुलगा यांचा सहभाग या समितीमध्ये असतो. तसेच डॉक्टर, वकील, शाळेचे मुख्याध्यापक, पोलीस अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांचाही या समितीत सहभाग करून घेता येतो.  या समिती मार्फत अल्पवयीन बालकांचे समाजप्रबोधन करून त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या जाऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर समिती स्थापन करावी अशी मागणी डॉ. अशोक गावित्रे यांनी  कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, नगराध्यक्ष पराग संधान व महिला बालकल्याण समितीच्या सभापती सविता कैलास मंजुळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.   दरम्यान,कोपरगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समितीची  स्थापना करण्यात आली असून सर्व ग्रामसेवकांची व  अंगणवाडी सेविकांची कार्यशाळा  डॉ.अशोक गावित्रे हे वेळोवेळी घेत त्यांना मार्गदर्शन करत आहे.

साई शक्ती स्कुलमध्ये विविध कार्यक्रम 
सेवेतूनच खऱ्या अर्थाने संस्कार घडतात : कोल्हे
हर्षा पाटील ‘इंटरनॅशनल अचिव्हर्स’ पुरस्काराने सन्मानित  

 डॉ. गावित्रे यांचे कोपरगाव नगरपालिकेस निवेदन

 कोपरगाव शहर : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण )अधिनियमानुसार महाराष्ट्र शासनाच्या २०१४ च्या परिपत्रकानुसार प्रत्येक प्रभागात बाल संरक्षण समिती स्थापन करणे हे बंधनकारक असल्याने या कायदेशीर बाबींचा विचार करून कोपरगाव शहरातील सर्व प्रभाग मध्ये या समितीची स्थापना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे यांनी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला केली आहे. 

बालविवाह,बालमजुरी,अमली पदार्थाचे सेवन लैंगिक अत्याचार इत्यादीचे प्रमाण वाढत चालले असून मागील काही वर्षात कोपरगाव शहरांमध्ये अनेक अल्पवयीन मुला- मुलींनी आत्महत्या देखील  केलेल्या  आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी या समितीचा निश्चितच उपयोग होईल असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. या समितीचा अध्यक्ष हा नगरसेवक असून अंगणवाडी सेविका या सदस्य सचिव म्हणून काम पाहतात तसेच एक १८ वर्षे वयाची मुलगी व एक २१ वर्षाचा मुलगा यांचा सहभाग या समितीमध्ये असतो. तसेच डॉक्टर, वकील, शाळेचे मुख्याध्यापक, पोलीस अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांचाही या समितीत सहभाग करून घेता येतो.

 या समिती मार्फत अल्पवयीन बालकांचे समाजप्रबोधन करून त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या जाऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर समिती स्थापन करावी अशी मागणी डॉ. अशोक गावित्रे यांनी  कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, नगराध्यक्ष पराग संधान व महिला बालकल्याण समितीच्या सभापती सविता कैलास मंजुळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

  दरम्यान,कोपरगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समितीची  स्थापना करण्यात आली असून सर्व ग्रामसेवकांची व  अंगणवाडी सेविकांची कार्यशाळा  डॉ.अशोक गावित्रे हे वेळोवेळी घेत त्यांना मार्गदर्शन करत आहे.

COMMENTS