Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. बांगर स्पर्श वुमेन्स हॉस्पीटल व आयव्हीएफ सेंटर तर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी

नाशिक : गर्भाशयाला गाठी असणे, ओटीपोटात दुखणे, पांढरे पाणी जाणे, मासिक पाळीची अनियमितता या सारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या महिलांसाठी डॉ. बांगर

संतापलेल्या नागरिकांनी केली रस्त्याची चोरी
ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीची तलवार नाचवत दहशत | LOKNews24
अफगाणिस्तान पुन्हा शक्तिशाली भूकंपाने हादरले

नाशिक : गर्भाशयाला गाठी असणे, ओटीपोटात दुखणे, पांढरे पाणी जाणे, मासिक पाळीची अनियमितता या सारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या महिलांसाठी डॉ. बांगर स्पर्श वुमेन्स हॉस्पीटल व आयव्हीएफ सेंटरतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. अनिता बांगर व डॉ. एच.वाय.बांगर यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देतांना डॉ.अनिता बांगर म्हणाल्या की, डॉ.बांगर स्पर्श वुमेन्स हॉस्पीटल व आयव्हीएफ सेंटरतर्फे ५ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सह्याद्री नगर (आश्‍विन नगर), मुंबई -आग्रा रोड, सिडको, नाशिक येथे दुर्बिणीद्वारे गर्भाशयातील गाठी काढणे, वंध्यत्वाशी संबंधीत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, गर्भपिशवीतील पडद्याचे दुर्बिणीद्वारे निदान व शस्त्रक्रिया करणे, गर्भपिशवी काढणे, बंद असलेल्या बिज नलिका पूर्ववत करणे यासारख्या शस्त्रक्रियांवरही मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे सोनोग्राफी वर २०%, रक्त तपासणीवर ३०% तर औषधांवर तब्बल २०% ची सवलतही यावेळी दिली जाणार आहे. 

या मोफत तपासणी शिबिराचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घेण्याचे आवाहन हॉस्पीटलच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी नावनोंदणीसाठी मो.८६६८६२७४८५, वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.

COMMENTS