Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. दत्ता विघावे यांचा मृत्यूपश्‍चात देहदानाचा निर्णय

अहमदनगर ः  नगर-‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे हे ‘विश्‍वची माझे घर’ या संकल्पनेनुसार आपली जीवनशैली बनविलेले महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सम

दुर्गामातांचा डॉ. महांडुळे यांनी केलेला सन्मान स्त्रीशक्तीचा उत्सव ः डॉ. बाबुराव उपाध्ये
Ahmednagar : नगरकरांना जोरदार झटका… महापालिकेच्या करात होणार तिप्पट वाढ?l Lok News24
राजुरीत मजुराचा संशयास्पद मृत्यू,

अहमदनगर ः  नगर-‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे हे ‘विश्‍वची माझे घर’ या संकल्पनेनुसार आपली जीवनशैली बनविलेले महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त समाजसेवी तथा क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक म्हणून ख्याती प्राप्त डॉ. दत्ता सिंधुताई बाबुलाल विघावे यांनी स्वतःच्या मृत्यूनंतर संपूर्ण शरीर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांना दान केले आहे. त्या आशयाचे प्रतिज्ञापत्र डॉ. दत्ता विघावे यांनी संबंधित विभागाला सादर केल्यानंतर सदर मंत्रालयाकडून डॉ. विघावे यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
माणसाच्या मृत्यूनंतर भले ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष, यांचा त्यांच्या धर्मानुसार दहन अथवा दफनविधी केला जातो. त्यानंतर ते मृत शरीर कोणत्याही कारणाशिवाय नष्ट होऊन जाते. एवढं अनमोल शरीर एखाद्याच्या मृत्यूनंतरही अनेकांच्या उपयोगी येऊ शकते, मेंदू, हृदय, फुफ्फुस, किडनी, डोळे, हात, पाय, त्वचा व इतर अवयव इतर गरजवंताना उपयोगी येऊन त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे जीवन आनंदमय बनू शकते. तसेच शरीराचे काही अवयव नव्याने वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या शिकाऊ डॉक्टरांना प्रॅक्टीस करण्यासाठी उपयोगी येतात. तेंव्हा प्रत्येकाने मृत्यूनंतर अवयव व देहदानाचा संकल्प करून भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातूून फॉर्म भरून आपले देश व समाजाप्रती असलेली आत्मीयतेची भावना जपत आपली जबाबदारी पार पाडावी. कला, क्रिडा, साहित्य, शिक्षक, सामाजिक, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाचे भूषण ठरलेले डॉ. दत्ता विघावे यांनी मृत्यूपश्‍चात देहदान करण्याच्या घेतलेल्या निर्णयाने समाजात त्यांच्या प्रती असलेला प्रेमभाव आणखी वाढला आहे. जर आपले शरीर आपल्या मृत्यूनंतरही अमर ठेवायचे असेल तर ज्या कोणाला मृत्यूपश्‍चात देहदान करायचे असेल तर संबंधितांनी 9096372082 या भ्रमणध्वनीवर डॉ. दत्ता विघावे यांच्याशी संपर्क करावा.

COMMENTS