Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा 10 वर्षांनी निकाल

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून या खटल्याचा निकाल पुढील मह

चेतन पिपाडा बनले कमर्शियल पायलट
निलकंठेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली
कॉपी मुक्त आणि भयमुक्त वातावरणात विद्यार्थी देत आहेत परीक्षा  

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून या खटल्याचा निकाल पुढील महिन्यातील 10 तारखेला लागणार आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्या झाल्याच्या 8 वर्षांनी खून खटला सुरू झाला होता. खुनाचा तपास पूर्ण होऊन सप्टेंबर 2021 मध्ये पुण्यातील विशेष न्यायालयाने 5 आरोपींविरोधात आरोप निश्‍चित केलेत आणि खटल्याला सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला चालू आहे. डॉ. दाभोलकर यांचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 ला खून झाला होता. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती.

COMMENTS