काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात संगमनेर मध्ये काँग्रेस आक्रमक…
शहर काँग्रेसची सातपुतेंना साथ व कर्डिले-जगतापांवर टीकास्त्र
समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्‍न पुन्हा उच्च न्यायालयात

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला होता, भाजपा उमेदवारांने अर्ज मागे घेतल्याने सातव यांची बिनविरोध झाली. ही पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष तसेच विरोधी पक्ष भाजपाचे आभार मानले. निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना प्रज्ञा सातव यांना प्रमाणपत्र देताना विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. या मान्यवरांनी विजयी उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

COMMENTS