Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयाची ज्ञानेश्‍वरी लोहकणे तालुक्यात प्रथम

कोपरगाव ः  महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या मार्च 2024  एस.एस.सी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून डॉ सी एम मे

व्यापारी संकुलाचे आज खा. शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजन
नगरच्या दोघांनी केली साडेनऊ कोटींची फसवणूक ;गुन्हा दाखल
जीवनात कितीही संकटे आली तरी, श्रद्धा कायम ठेवा ः श्री भास्करगिरीजी महाराज

कोपरगाव ः  महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या मार्च 2024  एस.एस.सी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून डॉ सी एम मेहता कन्या विद्यालयाचा शेकडा निकाल 97.43 टक्के  इतका लागला. विद्यालयाची विद्यार्थिनी ज्ञानेश्‍वर लोहकणे 97.40 टक्के  गुण मिळवून तालुक्यात प्रथम अली. विद्यालयातील एकूण 351 विद्यार्थिनी परीक्षेस बसून 131 विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह पास झाल्या.फर्स्ट क्लास मध्ये 138 विद्यार्थिनी ,द्वितीय श्रेणीमध्ये 59 व पास श्रेणीमध्ये चौदा विद्यार्थिनी पास झाल्या. विद्यालयातील 27 विद्यार्थिनीनी 90 टक्के  पेक्षा जास्त गुण मिळवून यश संपादन केले. कहार शर्वरी 95.60 टक्के  गुण मिळवून विद्यालयात द्वितीय, शिंदे धनश्री 95.20 टक्के  गुण मिळवून तृतीय, बिडवे श्रेया 93.60 टक्के  गुण मिळवून चतुर्थ, व आभाळे समीक्षा 93.20 टक्के  गुण मिळवून पाचव्या क्रमांकाने पास झाली. या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष  आमदार आशुतोष काळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे , सहाय्यक विभागीय अधिकारी तोरणे , नाईकवाडी , स्थानिक स्कूल कमिटीच्या चेअरमन मा पुष्पाताई काळे,जनरल बॉडी सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या प्रमोदिनी शेलार  ,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक ,सर्व सदस्य स्थानिक स्कूल कमिटी ,स्थानिक सल्लागार समिती ,शाळा व्यवस्थापन समिती ,शाळा व्यवस्थापन व विकास समिती ,माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, देणगीदार ,पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी, यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

COMMENTS