Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केजमध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग’ (एपीएल)चा दिमाखदार उद्घाटन सोहळा

केज । प्रतिनिधीकेज शहरातील क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी ठरलेली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग’ ((एपीएल) वर्ष 4 चे शानदार उद्घाटन सोहळा गुरुवार,

क्रिकेट खेळताना गुप्तांगाला चेंडू लागून तरुण जागीच ठार.
दोन वर्षांनंतर श्रेयस अय्यरचे टी-20 संघात पुनरागमन
बांगलादेश टी-20 विश्‍वचषकाबाहेर

केज । प्रतिनिधी
केज शहरातील क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी ठरलेली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग’ ((एपीएल) वर्ष 4 चे शानदार उद्घाटन सोहळा गुरुवार, 5 फेब्रुवारी 2026 रोजी स्व. अजित पवार स्टेडियम (पंचायत समिती, केज) येथे उत्साहात पार पडला. आयपीएलच्या धर्तीवर खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेत यंदा दहा कसलेल्या संघांनी सहभाग नोंदवला असून, केजकरांना पुढील काही दिवस क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन बाळराजे आवरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटनेते हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड, युवा नेते राहुल भैय्या गदळे, सरपंच अमोल डोईफोडे, व्यंकट हजारे आणि पोलीस अधिकारी समिर पाशा उपस्थित होते. मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत असे प्रतिपादन केले की, अशा क्रीडा स्पर्धांमुळे शहरातील तरुणांचे कौशल्य उजळते आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळते. मैदानावर घाम गाळणार्‍या आणि क्रिकेटमध्ये योगदान देणार्‍या सीनियर खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने अकबर इनामदार, प्रकाश मुंडे, बंडू मस्के, शेख जफर, फस्सी मौजन, प्रशांत जाधव, प्रेमजीत हजारे, पाशा शेख यांचा समावेश होता. लखन हजारे (बहुजन विकास मोर्चा) आणि ब्लू स्टार ग्रुप यांच्या वतीने या स्पर्धेचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. लखन हजारे, मुन्ना शिंदे, जहीर हाफी साहेब, प्रविण मस्के आणि प्रितम बटल्या साळवे यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा साकारली गेली आहे. शहरातील तरुणांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खेळाच्या माध्यमातून अभिवादन करावे, या उद्देशाने या लीगचे आयोजन करण्यात आले आहे. दहा संघांमध्ये कोण विजेतेपद पटकावणार, हे ठरवणार्‍या संपूर्ण केज शहराचे लक्ष आता या लीगकडे लागले आहे. प्रत्येक सामना अटीतटीचा आणि स्पर्धात्मक असून, क्रिकेट प्रेमींसाठी येणार्‍या दिवसात उत्साहवर्धक खेळ पाहायला मिळणार आहेत.

COMMENTS