Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समानतेची वागणूक दिली-जनाबाई काकडे

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील मौजे साबला येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे अ

तलाठी भरतीवर पुन्हा प्रश्‍नचिन्ह
वाजवी खर्चात सर्व विभागांनी कपात करावी; राज्य सरकारच्या सूचना
मुख्यमंत्र्यांची बहीण शेतात कामाला येईना !

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील मौजे साबला येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच जनाबाई नरहरी काकडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उमाशंकर शिंदे, ज्ञानेश्वर पांचाळ, लक्ष्मण काकडे, आश्रुबा काकडे, पोपट काकडे, शंकर नाईकनवरे  हे होते.
      या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ . जनाबाई काकडे यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमा प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना . असे म्हटले की . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता सर्वाना समान न्याय मिळाला पाहिजे असे मत व्यक्त केले . जातीभेद , लिंगभेद , गरीब श्रीमंत , उच्च निच्च या समाज विघातक गोष्टींना धारा दिला नाही पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच हुंडाबंदी , बाल विवाह पध्दत , सती जाने , केशवपण करणे या रूढी परंपरा बंद झाल्या पाहिजे या साठी कायदे निर्माण करण्याचे कार्य केले.  शिका संघटित व्हा संघर्ष करा  अशाप्रकारची शिकवण त्यांनी सर्व समाजाला देण्याचे काम  केले . तसेच अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य ही त्यांनी केले. तसेच उमाशंकर शिंदे आणि लक्ष्मण काकडे यांनी आपल्या मनोगतातून डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्याचे काम केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित आदर्श शिक्षक नरहरी काकडे , अभिमान सरवदे , सुर्यभान सरवदे मेजर , राजेंद्र सरवदे , बबनराव मुळे मेजर , विशाल काकडे , राहूल मुळे , दशरथ रोकडे , पवन सरवदे , विकास सरवदे , सोनाजी सरवदे , रानबा  सरवदे , महादेव घाडगे , गौतम रोकडे , अशोक रोकडे , गौतम घाडगे हनुमंत काकडे , गौतम घाडगे , लखन मस्के , संभाजी घाडगे इत्यादी मंडळी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल सरवदे यांनी केले तर आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांनी मानले .

COMMENTS