नाशिक प्रतिनिधी - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ जयंती निफाड शहरात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तहसी

नाशिक प्रतिनिधी – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ जयंती निफाड शहरात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तहसीलदार शरद घोरपडे. निफाड नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सौ रत्नमालाताई कापसे. नगरपंचायत चे मुख्याधिकारी अमोल चौधरी. निफाड पोलीस स्टेशनचे.पीआय एकनाथ ढोबळे. पी आय आनंद पठारे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रथमेश खडताळे . स्मारक समितीचे अध्यक्ष काशिनाथ आहिरे आदी मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार शरद घोरपडे. पी आय एकनाथ ढोबळे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर शेलार. जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे स्मारक समिती अध्यक्ष काशिनाथ अहिरे .मुख्याधिकारी अमोल चौधरी आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी मनोगत व्यक्त केले यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. याप्रसंगी सर्व राजकीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी मानवंदना दिली या वेळी माजी नगरसेवक नयना निकाळे .देवदत्त कापसे तसेच नंदू भाऊ कापसे सागर खडताळे. बाबूलाल थोरात. रोशन सोनवणे. धनंजय साळवे व मोठ्या संख्येने भीमसैनिक यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले..
COMMENTS