लातूर ः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही. एक एक करुन अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. आता

लातूर ः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही. एक एक करुन अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. आता काँग्रेसला मराठवाड्यात आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई आहेत. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आता लातूमधून देखील डॉ. अर्चना पाटील चाकूकर या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. असे झाल्यास लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो.
COMMENTS