Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेची दुसरी शाखा कोपरगावात

आमदार आशुतोष काळे यांची घोषणा

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व परिसरातील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांच्या गरजा पूर्ण करणार्‍या पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार

सात नंबर पाणी मागणी अर्जासाठी मुदतवाढ द्या
आ. आशुतोष काळेंकडून कोल्हे गटाला पुन्हा धक्का
येवलाच्या व्यापार वृद्धीसाठी गौतम बँकेची मदत होईल

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व परिसरातील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांच्या गरजा पूर्ण करणार्‍या पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब पतसंस्थेने कोपरगाव शहरातील व्यवसायिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली असून लवकरच संस्थेची दुसरी शाखा कोपरगावात सुरु होणार असून याहीवर्षी सभासदांना 15 टक्के लाभांश देणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सागितले आहे.
पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेच्या 2023-24 या वर्षाची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गौतम बँकेच्या गौतमनगर येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात (दि.17) रोजी संस्थेचे आधारस्तंभ माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करतांना आ.आशुतोष काळे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे होते. ते पुढे म्हणाले की, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्था कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाचे कर्मचारी व गौतमनगर परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक, व्यापारी तसेच ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांची आर्थिक गरज पूर्ण करीत आहे. आर्थिक व्यवहारातील शिस्त, तत्पर सेवा त्यामुळे दिवसेंदिवस संस्थेच्या ठेवीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ठेवीदारांच्या ठेवीप्रमाणे विश्‍वास देखील वृद्धिंगत होत असून संस्थेकडे 39 कोटीच्या ठेवी आहेत. अहवाल सालात संस्थेने 24 कोटी 34 लाख कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेची कर्ज वाटपाचे श्रेय कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहातील कर्मचारी, सभासद बंधू तसेच परिसरातील छोटे-मोठे व्यावसायिक यांनाच आहे. संस्थेचे थकबाकीचे प्रमाण 2.89 टक्के असून निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के आहे. सहकार कायद्यानुसार 27 कोटी 45 लाखाची गुंतवणूक केली असून लेखा परीक्षण अहवालानुसार संस्थेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून 90 लाख 27 हजार रुपयांचा नफा होवून पतसंस्था आर्थिक प्रगतीच्या दिशेने भक्कमपणे मार्गक्रमण करीत आहे. त्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांचे आ.आशुतोष काळे यांनी कौतुक केले व सभासदांना याहीवर्षी 15% लाभांश देण्याचे जाहीर केले. अहवाल वाचन संस्थेचे मॅनेजर मंगेश देशमुख यांनी केले. यावेळी सर्व विषय सभासदांनी एकमताने टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक दिलीपराव बोरनारे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, सुनील मांजरे, सुभाष आभाळे, सुधाकर रोहोम, अनिल कदम, श्रीराम राजेभोसले, प्रवीण शिंदे, गंगाधर औताडे, श्रावण आसने, गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, पंचायत समितीचे मा.सभापती अर्जुनराव काळे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, बँकेचे व्हा. चेअरमन सर्व संचालक मंडळ, गौतम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण संतोष पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड, कुक्कुट पालनचे व्हा.चेअरमन विजय कुलकर्णी, कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे मॅनेजर मंगेश देशमुख, गौतम सहकारी कुक्कुट पालनचे मॅनेजर सुरेश पेटकर, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट चे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे आदी मान्यवरांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS