Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. आंबेडकर यांचे पूर्णकृती स्मारक अनावरण समारंभासाठी आंबेडकर कुटुंबीयाला शासकीय आमंत्रण द्यावे 

नगर : नगर शहरातील मार्केट यार्ड चौक येथे महामानव भारतरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे अनावरण समारंभ येत्या 10 एप्रिल रोजी

उपमुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याची धमकी
वंचितांना सत्तेत आणण्याचा बाळासाहेबांचा प्रयत्न
सुट्या अन् सवलतीमुळे बस हाउसफुल

नगर : नगर शहरातील मार्केट यार्ड चौक येथे महामानव भारतरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे अनावरण समारंभ येत्या 10 एप्रिल रोजी ठेवण्यात आला आहे. या समारंभासाठी सर्व चळवळीतील नेते मंडळी सर्व पक्षातील पदाधिकारी त्यांना देखील आमंत्रित करण्यात यावे याचबरोबर दलीत चळवळीतील ज्येष्ठ नेते यांचा योग्य तो सन्मान करण्यात यावा.तसेच या समारंभाला आंबेडकर कुटुंबातील व्यक्तींना शासकीय आमंत्रण देण्यात यावे यापूर्वीही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंबेडकर कुटुंबातील बोलवण्यासाठी निवेदन दिले होते परंतु अद्यापही त्यांना निमंत्रण गेले नाही परंतु आत्ता दिलेले निवेदनाची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा समस्त बहुजनांच्या अस्मितेचा विषय असल्याने या ऐतिहासिक सोहळ्यास आंबेडकर घराण्याला शासकीय आमंत्रित करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदनासोबत गुलाबपुष्प देऊन करण्यात आली.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, हनीफ शेख, दीपक पाटोळे,रवींद्र कांबळे,अमर निरभवणे, लक्ष्मण माघाडे, योगेश गुंजाळ, विजय कांबळे, रोहन परदेशी, मोहन शिरसाट, गौतम पाचारणे,नितीन साळवे, संतोष जाधव आधी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS