कोपरगाव शहर : निवारा हाऊसिंग सोसायटी येथील रहिवासी सुहास लाटे यांचे चिरंजीव डॉ. आदित्य सुहास लाटे यांची शासकीय महाविद्यालय, सांगली येथे ऑर्थोपेड

कोपरगाव शहर : निवारा हाऊसिंग सोसायटी येथील रहिवासी सुहास लाटे यांचे चिरंजीव डॉ. आदित्य सुहास लाटे यांची शासकीय महाविद्यालय, सांगली येथे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून गुणवत्तेवर निवड झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास कोपरगाव नगर परिषदेचे नगरसेवक जनार्दन कदम सेवानिवृत्त सेंट्रल बँकेचे अधिकारी श्री. सुनील निसाळ, विष्णुपंत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सोमेश आढाव, प्रवीण चौधरी, ओम उदावंत, सुभाष पोटे, राहुल हसवाल, सुहास लाटे, छाया लाटे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्या या उत्तुंग आयुष्याबद्दल आ, आशुतोष काळे तसेच राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS