मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात यंदा अतिवृष्टीने शेतकर्यांचे कंबरडे मोडले होते. हातात आलेले पीक अतिवृष्टीने हिरावून घेतले होते. त्यातच हवालदिल झालेल
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात यंदा अतिवृष्टीने शेतकर्यांचे कंबरडे मोडले होते. हातात आलेले पीक अतिवृष्टीने हिरावून घेतले होते. त्यातच हवालदिल झालेल्या मराठवाडयातील अनेक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिला देत भरपाई रकमेत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकसान भरपाईच्या रकमेत प्रती हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. नव्या भरपाईनुसार, जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रुपयांऐवजी आता 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत. बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 ऐवजी आता 27 हजार रुपये मिळणार आहेत. तर बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी आता मिळणार 36 हजार रुपये मिळणार आहेत. नुकसानीची मर्यादाही वाढवली. दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंंत मदत मिळणार आहे. जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत सरकारने शासन निर्णय घेतला आहे. शेतकर्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नुकसानीसाठी 22232.45 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या निधीची तरतूद पुरवणी मागण्याद्वारे करण्यात येईल. त्यानुसार हा निधी विभागीय आयुक्तांना किंवा शासनाचे आदेश येतील त्याप्रमाणे वितरित करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. सरकारने नुकसानीची मर्यादाही वाढवली आहे. दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार असल्याचे या शासन निर्णयात म्हटले आहे.
अशी मिळणार नुकसान भरपाई – शासन निर्णयानुसार, जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रुपयांऐवजी 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत, तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 ऐवजी आता 27 हजार रुपये मिळणार आहेत. तसेच, बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी आता मिळणार 36 हजार रुपये मिळणार आहेत.
COMMENTS