Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात गँगवार करणारे सत्तेत नको

उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग ः राज्यात सध्या काय सुरू आहे, दिवसाढवळ्या हत्या, गोळीबार, राज्यात युती सरकार असतांना मुख्यमंत्री मनोहर जोशी होते तेव्हा मुंबईमध्ये असा

उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी धरला जोर
मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते- उद्धव ठाकरे
उद्धव-राज येणार एकत्र ?

सिंधुदुर्ग ः राज्यात सध्या काय सुरू आहे, दिवसाढवळ्या हत्या, गोळीबार, राज्यात युती सरकार असतांना मुख्यमंत्री मनोहर जोशी होते तेव्हा मुंबईमध्ये असाच गँगवार सुरू झाला होता. त्यावेळी दिवसाढवळ्या कुणाचीही हत्या केली जात होती. तेव्हा आम्ही हा गँगवार युती सरकारने मोडून काढला होता. आता तर सरकारमध्येच गँगवार सुरू झाला आहे. एकीकडे मिंधे गँग, दुसरीकडे भाजपची गँग आणि तिसरी गँग तर काही दिसेना झाली असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते रविवारी सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने राज्यातील इतर पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु आता सत्तेच्या या हव्यासापोटी भाजपचं संपून गेला आहे. आमच्या पक्षातील बेडके, भेकडे असलेली माणसे तुम्ही तुमच्या पक्षात घेतलेली आहेत. या भेडकांच्या जीवावर तुम्ही निष्ठावंतांचा पक्ष संपवायला निघाला आहात का? तुम्ही जरी आमचा पक्ष चोरला. तरीदेखील मी इतक्या ताकदीने का उभा आहे. याचा विचार सत्ताधार्‍यांना पडतो. माझी ताकद ही जनता आहे. ही जनता माझ्यासोबत आहे. मी वडिलोपार्जीत वारसा घेऊन पुढे जात आहे. ही जनता हेच माझं कवच आहे. तुम्ही म्हणता की आम्ही घराणेशाही पुढे नेत आहोत. तर हो आम्ही आमची वडिलोपार्जीत घराणेशाहीच पुढे नेत असल्याचे ठाकरेंनी बोलतांना सांगितले. यावेळी ठाकरेंनी नारायण राणे याच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, आजचा वार हा कोंबडी चोराचा नाही तर कोंबडी वड्याचा आहे. तसेच सरकार चौकश्या लावत असून आज त्यांचे दिवस आहेत. परंतु आमचाही दिवस येईल त्यावेळी आम्ही हा हिशेब चक्रवाढ व्याजासकट परत करणार आहोत. आमच्या सभेला लोकांना खुर्च्या शिल्लक राहत नाही. तर काहींच्या सभेला गर्दी जमत नसल्याचे ठाकरे म्हणाले. आम्ही भाड्याची माणसे सभेला बोलावत नसून आमच्या सभेला लोक स्वतःहून हजर राहत असल्याचे ठाकरे म्हणाले.

घोषणा करणारे हुकुमशहा सरकार नको- सरकारकडून आता नुसता घोषणांचा पाऊस पडतो आहे. असे नुसते घोषणा करणारे सरकार आम्हाला नको आहे. दुष्काळात तेरावा महिना करणारे सरकार या देशाला नको आहे. एकवेळ आम्हाला इंडिया आघाडीचे मिलीजुली सरकार चालणार मात्र आम्हाला हे असे हुकुमशहा सरकार नको आहे. आघाडीत अनेक विचारांचे लोक एकत्र आले आहेत. त्यामुळे आघाडी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे काम करते. आघाडी ही सर्वसामान्यांची असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी जनतेला संबोधित करतांना सांगितले.

COMMENTS