Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवारांसोबत गेलेल्यांना परत पक्षात घेऊ नका

मुंबई ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्राने आणि विवेक साप्ताहिकाने अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आल्याचे म्ह

अजित पवारांसह 9 आमदार होणार बडतर्फ  
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पाय खोलात
इथेनॉल बंदी उठवण्यासाठी केंद्रासोबत चर्चा करू

मुंबई ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्राने आणि विवेक साप्ताहिकाने अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आल्याचे म्हटले आहे. त्यातच अजित पवारांची कोंडी होत असून, अनेक आमदार परतीच्या मार्गावर दिसून येत आहे. यासंदर्भात आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी खासदार शरद पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांची बैठक मुंबईत बोलावली होती. यावेळी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात घेऊ नका, असा सूरच सर्व नेत्यांनी लावला. येणार्‍या निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारी आढावा बैठक घेतली. यावेळी अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात प्रवेश घेण्यास विरोध दर्शवण्यात आला आहे. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना पक्षात परत घेऊ नका, असे मत शरद पवारांच्या बैठकीत नेत्यांनी व्यक्त केले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राज्याच्या राजकारणातील उंची पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. काकांना सोडून गेलेले अजित पवार पुन्हा कुटुंबात परत जाऊ शकतात. याचे संकेत मिळू लागले आहेत. वरील मुद्द्यांना बळ देणार्‍या तीन घटना मागील काळात घडल्या होत्या. यामुळे देखील अजित पवार यांच्या परतीचे संकेत मिळाले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रकाशित होणार्‍या ‘पांचजन्य’ मासिकाने लोकसभेला महाराष्ट्रात महायुतीच्या पराभवासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना जबाबदार धरले होते. त्यामुळे भाजप आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. तो अद्याप कमी झाला नसतानाच ‘विवेक’ या संघांशी संलग्न साप्ताहिकानेही पराभवाचे खापर अजित पवारांवरच फोडले आहे. अजितदादांना संघ परिवाराकडून सातत्याने लक्ष्य केले जात असल्याने भाजप, दादा गटाची युती विधानसभेपर्यंत टिकून राहण्यावर शंका व्यक्त होऊ लागली आहे. विवेक साप्ताहिकात म्हटले आहे की, अजित पवारांशी हातमिळवणीने जनभावना पूर्णपणे भाजपविरोधात गेली. राष्ट्रीय विचारांचे नेते बनवणारा पक्ष अशी भाजपची प्रतिमा इतर पक्षांच्या बड्या नेत्यांना पक्षात समाविष्ट करून निवडणुका जिंकणारा पक्ष अशी झाली. अजित पवारांशी युतीच्या निर्णयाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. असे असूनही, त्याचा राग खूपच कमी लेखण्यात आला. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्र्यांनी कार्यकर्त्यांशी चांगला समन्वय राखला नाही, अशी धारदार टिप्पणीही करण्यात आली आहे

COMMENTS