Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केवळ जाहिरातबाजीसाठी पर्यावरण दिन नको

कोपरगाव शहर प्रतिनिधी ः देशभरात 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. या दिवसासाठी दहा-बारा दिवस शिल्लक राहिले आहेत. या दिवशी सर्व

रोहमारेचा साहिल रामेश्‍वर रणसुरे याची बेसबॉल स्पर्धेसाठी निवड
निवडणूक अधिकार्‍याला हाताशी धरून सोसायट्या जिंकल्या
माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू

कोपरगाव शहर प्रतिनिधी ः देशभरात 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. या दिवसासाठी दहा-बारा दिवस शिल्लक राहिले आहेत. या दिवशी सर्वत्र शासकीय स्तरावर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी उष्णतेने कहर केला जीवाची लाही लाही झाली ज्यांच्या कडे पैसे आहेत त्यांनी कुलर, एसी, पंखे विकत घेऊन तात्पुरता उपाय केला मात्र पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे त्या साठी मानव कारणीभूत आहे. भूतलावरील कोणताच प्राणी, पक्षी वृक्षाची तोड करत नाही. उलट वृक्ष संवर्धन करण्यात प्राणी पक्षाचे योगदान जास्त आहे मात्र वाढत्या तापमानाचा फटका जसा पशू पक्षांना बसला तसा तो मानवाला मोठ्या प्रमाणात बसला अनेक ठिकाणी नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत असताना दिसले तसेच गारव्या साठी झाडांचा शोध घेताना दिसतात मात्र झाडे लावताना कोणी दिसत नाहीत. शासन जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाच्या जाहिरातींवर कोट्यावधी रुपये खर्च करते पण प्रत्यक्ष परिणाम दिसत नाहीत त्या करिता नुसते शासकीय कार्यालये,शाळा कॉलेजेस पुरता पर्यावरण दिनाचे आयोजन न करता प्रत्येक नागरिक यात सहभागी होणे गरजेचे आहे. किमान एक दिवसा पुरता हा कार्यक्रम आयोजित न करता त्यात सातत्य ठेऊन पावसाळ्यात नुसते बिया रोपण,वृक्षारोपण न करता शाश्‍वत चित्र पाहायला मिळावे ही तयारी करावी तर आणि तरच पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि पर्यायाने त्याचा आनंद सर्वांना घेता येईल अन्यथा पैसे देऊन एसी,कुलर,पंखे मिळेल हो पण हिरवळ शोधून सापडणार नाही.

प्रत्येक कुटूंबाने किमान 5 देशी झाडाचे रोपण करत त्याच्या संगोपनांची संपूर्ण जबाबदारी घ्यावी तरच त्यांना शासकीय योजनेचा लाभ घेता येईल अशी काहीतरी नियमावली शासनाने आखात प्रत्येक कुटूंबावर वृक्षारोपण व संगोपनाची जबाबदारी निश्‍चित करावी. अ‍ॅड. नितीन पोळ

COMMENTS