Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी हिताच्या निर्णयात आडवे येऊ नका : मधुकर राळेभात

बारामती अ‍ॅग्रो जय श्रीरामच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

जामखेड ः साखर कारखान्याच्याबाबत आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी हिताच्या निर्णयाची अडवणूक करण्यासाठी सत्तेच्या जोरावर सरकारकडे कोण हट्ट करतेय, हे

३ मिनटात जाणूनघ्या दिवसभरातील २४ ठळक बातम्या | सुपरफास्ट २४ | LokNews24
…तरच, मनुस्मृतीच्या विरोधात बहुजन समाज का हे समजेल ः खेडेकर
आमच्यावर अन्याय करा तर आम्ही एका मिनिटात पलटी मारतो : सुजय विखे

जामखेड ः साखर कारखान्याच्याबाबत आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी हिताच्या निर्णयाची अडवणूक करण्यासाठी सत्तेच्या जोरावर सरकारकडे कोण हट्ट करतेय, हे जनतेला माहीत आहे. एका आमदारांची अडवणुकीची भूमिका मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या हिताविरोधी आहे, असे सांगत नाव घेत आ. प्रा राम शिंदे यांच्या विरोधी भूमिकेचा प्रा मधुकर राळेभात यांनी चांगलाच समाचार घेतला.

जामखेड तालुक्यातील हळगाव येथे शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी बारामती अ‍ॅग्रो जय श्रीराम शुगर कारखाना यूनिट 3 चा ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हस्ते मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला आहे. जय श्रीराम बारामती अ‍ॅग्रो शुगर युनिट 3 हाळगाव या साखर कारखान्याच्या मोळी पूजन कार्यक्रमाच्या मान्यवराची वेळी उपस्थिती कारखान्याचे व्हा. चेअरमन गुळवे आबा, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर (आबा) राळेभात, सी.ओ.ओ. प्रकाश जठार, व्हाईस प्रेसिडेंट मिलिंद देशमुख, किसन निबे, शेतकीय अधिकारी मधुकर मोहिते, बालाजी प्रभत, संतोष मगर, उस पुरवठा अधिकारी मदन लेकुरवाळेसह बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रा. राजेंद्र पवार, सुरेश भोसले, सुधीर राळेभात, किसनराव ढवळे, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, पाटील, चंद्रकांत राळेभात, सरपंच सुनील उबाळे, भारत काकडे, विलास जगदाळे, सुरेश पवार पाटील, राहुल बेदमुथ्था, सुंदरदास बिरंगळ , गजानन शिंदे, सतिश शिंदे, विठ्ठल चव्हाण, नारायण जायभाय, पांडुरंग ढवळे, प्रकाश सदाफुले, वैजीनाथ पोले, संतोष निगुडे, युवा नेते गाडेकर, यावेळी बारामती अ‍ॅग्रो जय श्रीराम शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आबा गुळवे म्हणाले की, आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती अ‍ॅग्रो जय श्रीराम शुगर कारखाना यूनिट 3 शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेत अहमदनगर जिल्ह्यात अग्रेसर राहील. यूनिट 1 प्रमाणेच हळगाव येथील यूनिट 3 ला भाव देणार. सर्व शेतकरयांशी सरळ संवाद साधत सर्व प्रश्‍न सोडणार आहे. आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना तालूक्यात कारखाना नसल्याने बाहेर ऊस देण्यात अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते. योग्य भाव न मिळणे, लांब वाहतूक असल्याने खर्चात वाढ, ऊसतोड टोळ्या न मिळणे, कारखानदाराकडुन वेळेवर बील न मिळणे, अशा त्रासदायक परिस्थितीतून तालुक्यातील शेतकरयांना बाहेर काढून त्यांचा विकास साधण्याच्या दृष्टीने आमदार रोहित पवार यांनी  हळगाव येथील जय श्रीराम शुगर कारखाना सातत्याने पाठपुरावा करून घेतला. यावेळी उपस्थित शेतकरयांच्या चेहरयावर आनंद दिसत होता.

प्रा. राजेंद्र पवार तालुकाध्यक्षपदी ?- यावेळी बोलतांना प्रा मधुकर राळेभात म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी प्रा राजेंद्र पवार हे इच्छुक आहेत. पवार हे पक्षातील प्रामाणिक, अभ्यासू, संयमी व्यक्तिमत्त्व आहे. तालुकाध्यक्षपद राजेंद्र पवार यांना दिले पाहिजे असे म्हणताच उपस्थित पदाधिकार्‍यांतील अनेकांच्या भुवया उंचावल्या, तर कुठे आनंदही झाला. राजेंद्र पवार योग्यच आहेत. मात्र तालुकाध्यक्षपदाबाबत शेवटी आमदार रोहित पवारांचा निर्णय अंतिम राहील मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

COMMENTS