या षडयंत्राला बळी पडू नका!

Homeताज्या बातम्याराजकारण

या षडयंत्राला बळी पडू नका!

अमरावती, नांदेड येथील हिंदूंच्या प्रतिक्रिया या उस्फूर्त आहेत अशी वल्गना करणारे चंद्रकांत पाटील यांच्या नावात पाटील असले तरी ते हिंदू नव्हे तर जैन धर

तपास यंत्रणा कुणाच्या दावणीला ?
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले : देवेंद्र फडणवीस
फुकट्या प्रवाशांकडून 11 लाखाचा दंड वसूल

अमरावती, नांदेड येथील हिंदूंच्या प्रतिक्रिया या उस्फूर्त आहेत अशी वल्गना करणारे चंद्रकांत पाटील यांच्या नावात पाटील असले तरी ते हिंदू नव्हे तर जैन धर्मिय आहेत! जैन धर्मात खासकरून व्यापारी जातींचा समावेश असतो. कोणताही व्यापारी आणि व्यापारी वर्ग हा राजकीय पक्षांचा धनरसद पुरवणारा असतो. त्यातून त्याला कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी काही सवलती आणि आर्थिक सुट मिळवून घेणे हा त्यांचा उद्देश नसतो. समाजात शांतता नांदावी असाच व्यापारी वर्गाची भूमिका असते. शांततेशिवाय आर्थिक व्यवहार आणि विकास होत नाही, हे त्यांना पुरते ठाऊक असते. चंद्रकांत पाटील संघाच्या मुशीतून आल्याने समाजात अशांतता निर्माण कशी होईल अशा स्वरूपाचे वक्तव्य करित असतात. कोणताही हिंदू हा प्रतिक्रियावादी नाही, तर त्याला तसे बनवले जाते. हिंदू कुणाला म्हणावे येथून आता संघर्षाची सुरूवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी अनेकदा म्हटले की, आमचे हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचे नाही, त्यांच्या या वक्तव्याने सिध्द केले आहे की, शेंडी-जाणवे असणारे हे हिंदू नसून हिंदूंचे शोषण करणार्‍या वरच्या वर्णाच्या उच्चजातीसमुह आहे, ज्यांचे उद्दिष्ट या देशात वर्णव्यवस्था मजबूत करण्याचे आहे. ज्याला ब्राह्मणी विचारांचा समुदाय म्हटले जाते. या समुहाकडे आजही धर्माची प्रछन्न मक्तेदारी आहे. देशातील अनेक बड्या मंदिरांची मालमत्ता यांची खाजगी मालमत्ता आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ. आंबेडकर आणि सरदार पटेल यांनी देशातील राजकीय सत्ताकेंद्र असणारे संस्थाने खालसा केली होती. मात्र, आजही मंदिर स्वरूपातील धार्मिक संस्थाने शासन संस्थेसमोर टिच्चून उभी आहेत. मंदिराच्या संस्थानातील पैसा हिंदूंच्या उत्थानासाठी त्यांनी कधी वापरला नाही. याउलट, उध्दव ठाकरे यांच्या व्याखेतील शेंडी-जानवे नसलेल्या हिंदूंचे शोषण करून आपल्या सर्व प्रकारच्या सत्ता टिकवण्याचा जो जीवतोड प्रयत्न होतो, त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे चंद्रकांत पाटील यांची ही अशी उलटसुलट विधाने असतात. शेतकरी, अल्पभूधारक, शेतमजूर, रोहयो मजूर अशा सर्व आर्थिक विपन्नावस्थेत असणारा हा हिंदू शेंडी जानवे नसलेला आहे. याउलट, अमरावती आणि अन्य शहरांतील ज्या संघप्रणित पक्ष-संघटना आहेत त्यांचे सर्व प्रमुख उच्चजातीय असून त्या सर्वांची मुले विदेशात आपले करियर बनविण्यासाठी रफूचक्कर झाले आहेत. सामान्य जनतेच्या मुलांना गुन्हेगारी कृत्य करायला लावून त्यांचे आयुष्य कायमचे उध्वस्त करण्याचा मानस असलेल्या चंद्रकांत पाटील आणि अन्य नेत्यांच्या वक्तव्य आणि कृती पासून शेंडी जानवे नसलेल्या हिंदूं समाजाने सावध राहण्याची गरज आहे. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांनीच शेंडी-जानवे नसलेल्या हिंदूंचे स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकीय प्रतिनिधित्व नष्ट केले आहे. अशा बाबींवर गंभीर आणि थेट भूमिका न घेणारे या शेंडी जानवे नसलेल्या हिंदूंचा दंगलीसारख्या हिंसक कारवायांमध्ये वापर करण्याच्या प्रयत्नातून सामान्य हिंदूंना पूर्णपणे विस्थापित करू पाहताहेत. अर्थात महाविकास आघाडी सरकारने देखील सत्ताधारी जात वर्गाचा हाच खेळ सुरू ठेवला आहे. वर्तमान सरकारने राज्यात घडविल्या जाणार्‍या हिंसक घटना घडणारच नाहीत, याची काळजी घ्यावी आणि अशा घटना घडवून आणणारे आणि त्यात सामिल होणारे यांच्यावर कठोर कारवाई करावी. लुटूपुटू राजकीय सत्तेचा खेळ आता शेंडी जनवेनसणारे हिंदू फार काळ खपवून घेणार नाही. महाराष्ट्र हा प्राचीन काळापासूनच समता आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करतो. गेल्या अर्धदशकापासून अधिक काळ मात्र महाराष्ट्राला असे अशांत केले जात आहे! चंद्रकांत पाटील यांच्या हिंदूंना उकसवणारे वक्तव्य हे हिंदू हिताचे नसून त्यांना आर्थिक-राजकीय उध्वस्त करण्याचे षडयंत्र आहे, या षडयंत्राला बळी पडू नका!

COMMENTS