Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘त्या’ रस्त्याचा निधी दुसरीकडे वळवू नका ः राष्ट्रवादीची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव शहरातील धारणगाव प्रभाग क्र. 6 मधील धारणगाव रोड ते मुंदडा घर रस्ता व टिळकनगर मधील शनी मंदिर ते धारणगाव रोड रस्त्याचा न

अहमदनगरमध्ये 2 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
अहमदनगर : रोहित पवार यांच्या स्वराज्यध्वज पूजन यात्रेचे पेमगिरी किल्ल्यावर पूजन
समता स्कूलची दहावीच्या उज्जवल निकालाची परंपरा कायम

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव शहरातील धारणगाव प्रभाग क्र. 6 मधील धारणगाव रोड ते मुंदडा घर रस्ता व टिळकनगर मधील शनी मंदिर ते धारणगाव रोड रस्त्याचा निधी माजी आ.कोल्हेंच्या दबावातून दुसरीकडे वळवून या रस्त्याचे काम थांबवू नका अशा आशयाचे निवेदन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, प्रभाग क्र. 6 मधील धारणगाव रोड ते मुंदडा घर रस्ता व टिळकनगर मधील शनी मंदिर ते धारणगाव रोड रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्याची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी सदरच्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या सूचना कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार कोपरगाव नगरपरिषदेने सदरच्या रस्त्यांसाठी तांत्रिक मंजुरी मिळविली आहे. परंतु शहर विकासात माजी आमदार कोल्हेंकडून राजकारण केले जात असून सदरच्या रस्त्यांचा निधी दुसरीकडे वळविण्याचे कटकारस्थान सुरु असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन देवून या रस्त्यांचा निधी दुसरीकडे न वळवता या रस्त्यांचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, माजी नगरसेवक मंदार पहाडे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, प्रकाश दुशिंग, आकाश डागा, विजय दाभाडे, दिनेश संत, विजय नागरे, संजय कट्टे, प्रवीण शेलार, सुनील वैरागळ आदी उपस्थित होते.

COMMENTS