Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंदोलनाला गालबोट लावू नका

मनोज जरांगेंचे मराठा तरुणांना आवाहन

जालना/प्रतिनिधी ः गेल्या 11 दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. सरकारने शासन निर्णयाचा

विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार ः मनोज जरांगे
मनोज जरांगेंची ईडीमार्फत चौकशी करा
मराठा समाजाची बैठक पुढे ढकलली

जालना/प्रतिनिधी ः गेल्या 11 दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. सरकारने शासन निर्णयाचा अध्यादेश काढल्यानंतरही ते आपल्या उपोषणावर ठाम आहे. मात्र त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आंदोलनाला कुठेही गालबोट न लावण्याचे आवाहन मराठी बांधवांना केले आहे.
या आंदोलनाला सर्व मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. पण या आंदोलनाला कुठेही गालबोट लागू नये असे मी आवाहन करतो. कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये, आत्महत्या करू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केले आहे. तुम्ही जीवन संपवायला लागले तर आरक्षणाचा फायदा उचलणार कोण? असेही ते यावेळी म्हणाले. आरक्षणासंदर्भात सरकारसोबत चर्चेविषयी बोलताना चर्चेसाठी आम्ही पिशव्या भरुन तयार आहोत, सरकार जीआरमध्ये बदल करत असेल तर आम्ही दोन पाऊल मागे सरकतो. मात्र सरकारचा निरोपच नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षणाचा लढा सुरू असतानाच ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा जोरदार विरोध आहे. याच मागणीवरुन धनगर समाजाने आक्रमक भूमिका घेत थेट सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून जाहीर निषेध नोंदवला आहे.

COMMENTS