Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केएसबी केअर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गव्हर्मेंट पॉलिटेक्निक, पुणे येथे अत्याधुनिक एफएमएम लॅबची देणगी 

केएसबी लिमिटेड या जगभरांतील आघाडीच्या पंप्स, वॉल्ह्व्ज, आणि सिस्टम्सच्या उत्पादक कंपनी कडून नुकत्याच त्यांच्या सीएसआर विभाग असलेल्या ‘केएसबी केअर

अर्बन बँक निवडणूक तुर्त थांबवण्याची सरकारला विनंती
दानवेंच्या कार्यकर्त्यांचा कुंभार कुटुंबावर हल्ला
हिंदू मुस्लिम मध्ये दंगल घडवण्याचा भारतीय जनता पार्टी व एमआयएमचा कट – अंबादास दानवे

केएसबी लिमिटेड या जगभरांतील आघाडीच्या पंप्स, वॉल्ह्व्ज, आणि सिस्टम्सच्या उत्पादक कंपनी कडून नुकत्याच त्यांच्या सीएसआर विभाग असलेल्या ‘केएसबी केअर चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या माध्यमातून पुण्यातील गव्हर्मेंट पॉलिटेक्निकच्या (जीपीपी) विद्यार्थ्यांसाठी  एक अत्याधुनिक अशी फ्लुईड मेकॅनिक्स ॲन्ड मशीनरी लॅब (एफएमएम) लॅब देणगी स्वरुपात दिल्याची घोषणा करण्यात आली आहे. या मुळे आता जीपीपी च्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा केएसबी कडून व्यक्त केली जात आहे. 

या प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. यामध्ये विविध चाचण्यांचे सेटअप जसे विविध टर्बाइन्सचे विविध प्रकारचे फ्लो मेजमेंट्स, मुलभूत गणकाची तत्वे आणि थेट मेजरमेंट्स चा परस्परसंबंध यांचा समावेश आहे.  यामुळे जीपीपीच्या विद्यार्थ्यांना पंपाची कार्यक्षमता मोजणे समजून घेणे सोपे जाईल तसेच विविध टर्बाईन फ्लोची गणना करता येईल. ही अत्याधुनिक अशी एफएमएम लॅबोरेटरी आहे की जी कदाचित पहिलीच अशी लॅबोरेटरी असेल जी राज्यातील सरकारी कॉलेजेस मध्ये प्रथमच लावण्यात आली आहे.  केएसबी ने नेहमीच अशा कौशल्य विकासांच्या प्रसारासाठी वचनबध्दता दर्शवली आहे.

या सीएसआर प्रकल्पा विषयी आपले विचार व्यक्त करतांना केएसबी लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव जैन यांनी सांगितले “ पीपल, पॅशन, परफॉर्मन्स हाच उद्देश नेहमी केएसबी ने प्रगती करतांना समोर ठेवला आहे. माझा असा विश्वास आहे की आम्ही नेहमीच सातत्याने लोकांच्या शिक्षण आणि विकासावर लक्ष्य केंद्रित केल्यामुळे  आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट उत्पादने आणि सेवा देऊ शकत आहोत.

भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे.  आज अनेक व्यावसायिक उद्योजकांकडे कौशल्यप्राप्त मनुष्यबळाचा अभाव आहे.  जीपीपी सारख्या उपक्रम यात महत्त्वाची भुमिका बजावतात.   ते विद्यार्थ्यांना क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख कौशल्यांनी मुलांना घडवतात.  जीपीपी चा हा प्रकल्प म्हणजे बाजारपेठ-शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील भागीदारीचे उत्तम उदाहरण असून यामुळे आमची कौशल्यांच्या विकासासाठी आवश्यक आणि वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी असलेली गरज पूर्ण होत आहे.

केएसबी ने नेहमीच ज्या समाजात काम केले आहे त्याची जबाबदारी घेतली आहे.  सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच शाश्वत विकासाची लक्ष्ये पूर्ण  करण्यासाठी अनेक सामाजिक क्षेत्रात कामे केली आहेत. माझा असा ठाम विश्वास आहे की या नव्याने विकसित केलेल्या एफएमएम लॅब मुळे शिक्षण आणि कौशल्य विकासात महत्त्वपूर्ण भुमिका ठरेल.

एक प्रसिध्द म्हण आहे – कौशल्याच्या विकासातील गुंतवणूक म्हणजेच भविष्यातील गुंतवणूक”

या सीएसआर प्रकल्पा विषयी माहिती देतांना केएसबी लिमिटेड च्या एचआर विभागाचे उपाध्यक्ष श्री शिरीष कुलकर्णी यांनी सांगितले “  केएसबी मध्ये आमचा असा विश्वास आहे की सामाजिक आणि पर्यावरणाशी सुसंगत व्यवसाय करावा.  आमच्या सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पर्यावरण, जीवनव्यापन आणि कौशल्य विकास यांसारख्या समस्यांवर उपाय शोधत असतो.  जीपीपी मध्ये आमच्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही यूएनडीपीच्या शाश्वत विकास लक्ष्याच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि चांगले काम तसेच रोजगार ‍निर्मितीवर काम करत आहोत.  अद्ययावत अशा फ्लुईड मेकॅनिक्स आणि मशीनरी लॅब मुळे विद्यार्थ्यांना जगभरांतील औद्योगिक स्तरावरील पंप्स, व्हॉल्व्ह्ज आणि टर्बाइन्स चा अनुभव मिळेल.  मी जीपीपीचे सर्व विद्यार्थी आणि प्रशिक्षकांना शुभेच्छा देतो आणि  केएसबी मध्ये सीएसआर मध्ये काम करणार्‍या टिमचेही अभिनंदन करतो.”

COMMENTS