Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता शहरांमध्ये स्वच्छतेसाठी नागरिकांचे ठिकठिकाणी श्रमदान

राहाता प्रतिनिधी ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान देशभरात स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन पंत

विखेंचे बॅलन्सशीट तपासण्याची वेळ आता आली आहे… तनपुरेंचा सूचक इशारा
मुक्या प्राण्यांसाठी नगरमध्ये होणार 100 पाणवठे
आयपीएल स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर l DAINIK LOKMNTHAN

राहाता प्रतिनिधी ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान देशभरात स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते यानिमित्ताने राहाता शहरांमध्ये स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राहाता नगर परिषदेच्या वतीने रविवारी शहरांमध्ये एक तारीख एक तास स्वच्छतेसाठी या उपक्रमांतर्गत शहरांमध्ये ठिक-ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या उपक्रमात राहाता पोलीस स्टेशन,नगर परिषदेचे कर्मचारी, शासकीय अधिकारी, शाळा विद्यालय,तसेच सामाजिक संस्थेचे पदाधिकारी,राजकीय पदाधिकारी असे अनेक नागरिक स्वयं पूर्तीने सहभागी झाले होते यामध्ये राहाता शहरातील पोलीस स्टेशनमध्ये नगर परिषदेचे कर्मचारी, पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच साईयोग फाउंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहीम सकाळी सात ते आठ या वेळेमध्ये राबवून पोलीस स्टेशन चा परिसर स्वच्छता करून श्रमदान करण्यात आले यावेळी राहाता पोलीस स्टेशनचे स.पो.नी.कैलास वाघ,पोलीस उपनिरीक्षक चौधरी,पोलीस उप निरीक्षक गुंजाळ, सहायक फौजदार सांगळे,पोलीस हेडकॉन्स्टेबल शेलार व साईयोग फाउंडेशनचे डॉ बापूसाहेब पानगव्हाणे, ड.गोरख दंडवते, भाऊसाहेब बनकर, रवींद्र धस, बबलू फटांगरे,राजु वायकर,अरविंद बावके, दास कुंभकर्ण राजेंद्र फंड,नारायण गाडेकर, संजय वाघमारे, व्यंकटेश अहिरे, अशोक वाघ, विष्णू गाडेकर, मुन्ना शहा, नगर परिषदेचे कर्मचारी रविंद्र बोठे, अशोक साठे, तसेच राहता पोलीस स्टेशन,साई योग फाउंडेशन,राहाता नगरपरिषद चे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS