Homeताज्या बातम्यादेश

देशभरात डॉक्टरांचा संप

कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार- हत्येचा नोंदवला निषेध

नवी दिल्ली ः कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या संपाचा शनिवारी आठवा दिवस असतांना या

असल्फा विभागात जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप 
“काही घाबरू नका . मी स्वामींना सांगितले आहे. तुम्ही येताना पेढे घेऊन या.” (Video)
सत्यजित तांबेंची काँग्रेसमधून हकालपट्टी

नवी दिल्ली ः कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या संपाचा शनिवारी आठवा दिवस असतांना या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षेसह विविध मागण्यांसाठी देशभरातील डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारला आहे. आपात्कालीन सेवा वगळता सर्व आरोग्य सुविधा शनिवारी सकाळपासून बंद ठेवत डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी सकाळी 6 ते रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तास बंदची घोषणा केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात आरोग्यसेवा काही प्रमाणात कोलमडली आहे.
संपामुळे सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये आपत्कालीन सेवा वगळता सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले होते. मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे की, संपात ओपीडी चालणार नाही. आणीबाणीशिवाय इतर कोणत्याही शस्त्रक्रिया केल्या जाणार नाहीत. 9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये ऑन ड्युटी पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. यानंतर 14 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा याच रुग्णालयात तोडफोड आणि हाणामारी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना या प्रकरणावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. राजस्थानमधील जोधपूरमध्ये निवासी डॉक्टरांनीही आपत्कालीन आणि आयसीयूमध्ये काम करणे बंद केले आहे. केवळ वरिष्ठ डॉक्टरच आपत्कालीन सेवा पाहत आहेत. राजस्थानमधील जोधपूरमध्ये निवासी डॉक्टरांनीही आपत्कालीन आणि आयसीयूमध्ये काम करणे बंद केले आहे. केवळ वरिष्ठ डॉक्टरच आपत्कालीन सेवा पाहत आहेत. भोपाळमध्ये निवासी डॉक्टर संपावर आहेत. कालपर्यंत सरकारी रुग्णालयांमध्ये ओपीडी बंद होती. खासगी रुग्णालयातील डॉक्टरही पासून संपावर आहेत. चेन्नई, तामिळनाडू येथील राजीव गांधी सरकारी सामान्य रुग्णालय आणि मद्रास मेडिकल कॉलेजचे निवासी डॉक्टर शनिवारी सकाळपासून घोषणा देत आहेत. अहमदाबाद, गुजरातमधील निवासी डॉक्टरांनी वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी प्ले कार्डसह घोषणाबाजी केली. भोपाळमधील एम्ससह मध्य प्रदेशातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये शेकडो निवासी डॉक्टरांनी काम बंद केले. त्यामुळे राज्यभरातील वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला. अनेक रुग्णालयांमध्ये रुग्ण उपचाराविना पडून होते. ओपीडी आणि ओटी सेवा ठप्प आहेत. फक्त इमर्जन्सी आणि आयसीयू सुरू ठेवण्यात आले आहेत.

डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या काय – इंडियन मेडिकल असोसिएशनने निवासी डॉक्टरांच्या कामाच्या आणि राहणीमानात बदल करण्याची मागणी केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने 2023 मध्ये महामारी रोग कायदा, 1897 मध्ये केलेल्या सुधारणांचा समावेश करून केंद्रीय कायद्याची मागणी केली आहे. या गुन्ह्याचा सखोल आणि व्यावसायिक तपास करून विहित मुदतीत न्याय देण्याची मागणी डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे. यासोबतच 14 ऑगस्टच्या रात्री आरजी कार हॉस्पिटलच्या आवारात झालेल्या तोडफोडीत सहभागी असलेल्यांची ओळख पटवून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, पीडितेच्या कुटुंबीयांना क्रूरतेच्या अनुषंगाने योग्य आणि सन्माननीय भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातही उमटले संपाचे परिणाम – महाराष्ट्रात देखील या संपाचे परिणाम जाणवत असून राज्यातील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. मुंबईतील केईएम, कूपर, सायन, टाटा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी संप पुकारला आहे. शहरातील काही खाजगी सुविधांवरील बाह्यरुग्ण सेवा शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून 24 तासांसाठी बंद आहे. मात्र आपत्कालीन सेवा उपलब्ध होत्या. वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलने देखील नियमित कामकाज स्थगित केले आहे. त्याचप्रमाणे मुंबईततील प्रमुख हॉस्पिटल्समध्येही संपाचे पडसाद उमटले आहे. सोमय्या रुग्णालयातील सुमारे 90 निवासी डॉक्टर, इंटर्न आणि कनिष्ठ डॉक्टर शनिवारी संपावर जाणार आहेत.

COMMENTS