Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनीच्या सहा प्राध्यापकांना डॉक्टरेट पदवी

कोपरगाव तालुका ः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित इंजिनिअरींग कॉलेज, पॉलीटेक्निक व संजीवनी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मधिल एकुण सहा प्

सिव्हील जळीतकांड प्रकरणी चार महिलांना झाली अटक
गडहिंग्लज -चंदगड रोडवर भीषण अपघात! | माझं गावं माझी बातमी | LokNews24 |
मृतदेहाची नोंद न करता परस्पर अंत्यविधी करणार्‍यावर कारवाई व्हावी

कोपरगाव तालुका ः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित इंजिनिअरींग कॉलेज, पॉलीटेक्निक व संजीवनी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मधिल एकुण सहा प्राध्यापकांनी विविध संशोधनात्मक प्रबंध सादर करून डॉक्टरेट (पीएच.डी.) ही बहुमानाची पदवी प्राप्त केली आणि आपल्या प्रतिभा संपन्नतेच्या जोरावर संशोधनात्मक कार्य सिध्द केले. संजीवनीच्या विविध संस्थांच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये संशोधन कार्यास पुरक असे संशोधन केंद्र असल्यामुळे पीएच.डी. होणार्‍यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, असे संजीवनीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
           पत्रकात पुढे म्हटले आहे की, संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅड. कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाचे डॉ. देविदास लोखंडे यांनी ‘क्रॉस एन्ट्री बेस्ड सॉफ्ट हॅन्डओव्हर ऑफ सीडीएमए इन व्हायरल मोबाईल कम्युनिकेशन नेटवर्क’ या विषयावर प्रबंध सादर करून डॉक्टरेट पदवी मिळविली. तर याच विभागातील डॉ. मुझफ्फरअली सय्यद यांनी ‘डेव्हलपमेंट ऑफ वेदिक मॅथेमॅटीक्स बेस्ड मल्टीप्लायर सर्किट’ या विषशयावर प्रबंध सादर केला आणि पी.एचडी पदवी प्राप्त केली. डॉ. लोखंडे व डॉ. सय्यद या दोघांनाही संजीवनीच्या इसीई विभागाचे प्रमुख डॉ. बी. एस. आगरकर यांनी मार्गदर्शन  केले. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाती डॉ. चेतन बावनकर यांनी ‘डिटेक्शन अँड प्रिव्हेंशन ऑफ बोटनेट अटॅक्स इन इंटरनेट ऑफ थिंग्ज युझिंग ब्लॉक चैन’ या विषयावर प्रबंध सादर करून डॉक्टरेट पदवी मिळविली. त्यांना ओरीएन्टल युनिव्हर्सिटी, इंदोरच्या डॉ. संजीव कुमार शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील डॉ. अमोल वाबळे यांनी ‘सरफेस मॉडीफिकेशन ऑफ अल्युमिनिअम अलॉयज  युझिंग फ्रिक्शन  स्टीर प्रोसेस’ या विषयावर प्रबंध सादर केला व पुणे येथिल सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने तो ग्राह्य धरत त्यांना पी.एचडी ही पदवी बहाल केली. त्यांना याच विद्यापीठातील डॉ. एस.बी. पाटील यांचे मार्गदर्शन  लाभले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे यांनी सर्व नवोदित पीएच.डी. धारकांचे अभिनंदन केले. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी सर्वांचा छोटेखानी सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देवुन नव्याने केलेल्या संशोधनाचा विध्यार्थ्यांना फायदा करून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, एसआयएमएसचे डायरेक्टर डॉ. विनोद मालकर, पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रा. ए. आर. मिरीकर, विभागप्रमुख डॉ. बी.एस. आगरकर, डॉ. अनिल पवार, डॉ. माधुरी जावळे व डॉ. प्रसाद पटारे उपस्थित होते. विश्‍वस्त सुमित कोल्हे यांनीही सर्वांचे अभिनंदन केले.

COMMENTS