राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचे एकही उमेदवार शिल्लक ठेवू नका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचे एकही उमेदवार शिल्लक ठेवू नका

चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष पद भेटल्यानंतर पहिल्यांदाच धुळे दौऱ्यावर

धुळे प्रतिनिधी : भाजप पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) हे  प्रदेशाध्यक्ष पद भेटल्यानंतर पहिल्यांदाच धुळ

शिंदे-फडणवीस दररोज १८-१८ तास काम करतात 
भाजप पुन्हा मविआडीला देणार धक्के ?
बावनकुळे यांच्या जुन्या मतदारसंघात खापा आणि गुमथी दोन्ही ठिकाणी भाजप विजयी 

धुळे प्रतिनिधी : भाजप पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) हे  प्रदेशाध्यक्ष पद भेटल्यानंतर पहिल्यांदाच धुळे दौऱ्यावर आले असता, त्यांनी पक्षाची संघटनात्मक बैठक या कार्यक्रमांतर्गत कार्यकर्त्यांशी आपल्या भाषणातून संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचे एकही कार्यकर्ते उमेदवारी लढवण्यासाठी शिल्लक ठेवू नका, असेच थेट आव्हान उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

COMMENTS