Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेल्फी पॉईंटचे आय लव्ह उरुण-इस्लामपूर करा; अन्यथा सेल्फी पॉईंट काढू : अखिल भारतीय मराठा सेवा संघ

इस्लामपूर / प्रतिनिधी : जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरच्या वतीने शहरात नव्याने होत असलेल्या सेल्फी पाईटचे आय लव्ह इस्लामपूर या असे नामकरण करण्यात आले

सातारा नगराध्यक्षांच्या बोटचेप्या धोरणामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार रखडला : अमोल मोहिते यांचा आरोप
प्रतापगड कारखान्यात संस्थापक सहकार पॅनेलची एकहाती सत्ता : सर्व 21 जागांवर विजय
महाविद्यालयीन युवकाशी अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी हावलदाराविरुध्द गुन्हा दाखल

इस्लामपूर / प्रतिनिधी : जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरच्या वतीने शहरात नव्याने होत असलेल्या सेल्फी पाईटचे आय लव्ह इस्लामपूर या असे नामकरण करण्यात आले आहे. त्या पॉईटच्या नावामध्ये इस्लामपूर ऐवजी उरुण-इस्लामपूर असे करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष दुष्यत राजमाने यांना दिले.
इस्लामपूर शहराची ओळख ही उरुण-इस्लामपूर अशी आहे. इस्लामपूर नगरपालिक ही उरुण इस्लामपूर नगरपरिषद या नावाने शासन दरबारी अशी नोंद आहे. उरुण हे नाव इस्लामपूर शहरातील नागरिकांची अस्मिता आहे. या अस्मितेला कोणीही धक्का लावू शकत नाही. तरी या सेल्फी पॉईंटचे नाव आय लव्ह इस्लामपूर ऐवजी आय लव्ह उरुण-इस्लामपूर करावे. अन्यथा आम्ही सेल्फी पाईटचे उद्घाटन होवू देणार नाही. हा जर बदल झाला नाही तर आम्ही सर्व नागरिक मिळून हा सेल्फी पाईंट काढू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला.
निवेदनावर अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री प्रमोद मोरे, सुरज पाटील, विकास परीट, बबलू पाटील, अमित मगदूम, अजिंक्य पाटील, विक्रम पवार, निलेश जाधव, पंकज पवार, प्रशांत वळसे, धनाजी शिरसे, श्रीकांत गायकवाड, धीरज पाटील, गणेश पाटील यांच्या सह्या आहेत.

COMMENTS