Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कीर्तनाचे धडे गिरवणाऱ्या ज्ञानेश्वरीला मिळाला हार्मोनियम भेट .. ! 

अकोले : अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिवाळी या सणाला अनन्य साधारण असे महत्व असून याच दिवाळीचे औचित्य साधून कीर्तनाचे धडे गिरवणाऱ्या ज्ञानेश्वरी

मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अपारंपारिक ऊर्जा वापरास चालना द्यावी : अपारंपारिक ऊर्जा मंत्री सावे
पावसाळ्यात सुरळीत वीजपुरवठा व सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य द्या ; अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांचे निर्देश
Displaying 1012007618.jpg

अकोले : अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिवाळी या सणाला अनन्य साधारण असे महत्व असून याच दिवाळीचे औचित्य साधून कीर्तनाचे धडे गिरवणाऱ्या ज्ञानेश्वरी पारखे हिला हार्मोनियम भेट देत अंधारातून सुरू असलेल्या तिच्या या प्रवासाला प्रकाशाकडे नेण्याचे प्रा.डॉ. सुनील शिंदे यांच्या योगदानातून आणि “रविवारची शाळा” यांच्या मुळे ही होऊ शकले.

               अकोले तालुक्यातील धामणगावपाट येथील वारकरी शिक्षण संस्थेत कीर्तनाचे धडे गिरवणाऱ्या ज्ञानेश्वरी पारखे हिला हार्मोनियम  हवी होती.त्यासाठी तिच्या आईची गेल्या दोन वर्षांपासून धडपड सुरू होती .तिची आई विद्या एका दुकानात जेम तेम पगारावर काम करते.तीच मुलीने कीर्तनकार बनण्याचे स्वप्न आहे.म्हणून तिने ज्ञानेश्वरी हिला एका वारकरी शिक्षण संस्थेत  घातले.तिथली फी आणि आपला उदरनिर्वाह म्हणजे त्या मायलेकींची कसरत सुरू होती.मध्येच येणारे आजारपण यामुळे तिची आई विद्या आपल्या मुलीला हार्मोनियम घेणे दूरदूर पर्यंत शक्य नव्हते.पण ज्ञानेश्वरी हिची जिद्द ती मैत्रींनिनच्या हार्मोनियमवर सराव करायची.

आई या दिवाळीला मला कपडे घेऊ नको गं … मला हार्मोनियम घे…या तिच्या म्हणण्याने आई विद्या ही अस्वस्थ होती . पण विद्या ज्या दुकानात काम करते तिथे तिला सामाजिक कार्यकर्ते संगीता साळवे या भेटल्या त्यांनी त्यांची ही अस्वस्थता त्यांच्या कडे व्यक्त केली.त्यानंतर त्या दोघी अकोल्यात सुरू असलेल्या आई वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या “रविवारची शाळा ” या कार्यालयात गेल्या तिथे त्यांनी ही शाळा चालविणारे श्रीनिवास रेणुकदास यांना हे सर्व कथन केले.त्यांनी आपण करू असा शब्द दिला त्यानंतर रेणूकदास यांनी हा विषय प्रा.डॉ. सुनील शिंदे यांच्या कडे मांडला त्यांनी कुठलेही आढे वेडे न घेता त्यांची मुलगी  स्वर्गीय सकृता शिंदे हिच्या स्मरणार्थ हार्मोनियम देण्याचा शब्द दिला आणि आज एका छोट्या कार्यक्रमात त्यांनी ज्ञानेश्वरी हिला हार्मोनियम सुपूर्द केली.तिची आई या हार्मोनियम भेटीने सुखावली तिचे डोळे पाणावले.तिने आज माझ्या ज्ञानेश्वरी चे हे स्वप्न पूर्ण होते याचा मला आनंद आहे असे म्हणत विद्या हिने हार्मोनियम साठी मी गेली दोन वर्ष धडपडत होते आज ते स्वप्न स्वामींनी पूर्ण केले असे म्हणत असताना तिला आश्रु अनावर झाले होते.त्याच दरम्यान जिच्या स्मरणार्थ हार्मोनियम दिली त्या तिच्या आठवणीने सुनील शिंदे सर यांना देखील आश्रु अनावर झाले होते.यावेळी उपस्थित सर्वच थोड्या वेळासाठी भाऊक झाल्याचे  पहायला मिळाले.

            यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे, अगस्ती शिक्षण संस्थेचे सचिव सतीश नाईकवाडी , पत्रकार प्रा. बाळासाहेब मेहेत्रे, अगस्ती विद्यालयाचे प्राचार्य मंगेश खांबेकर, मॉडर्न हायस्कूल चे उप प्राचार्य सुधीर जोशी , ह. भ. प. नारायण महाराज जोंधळे , घनश्याम माने, मनोज गायकवाड उपस्थित होते.

COMMENTS