भातकुडगाव फाटा : ज्ञानेश्वर कारखाना आता सर्वदृष्टीने परिपूर्ण झाला असून पुढील काळात कुठलाही भांडवली खर्च नाही. वेळेत ऊस तोडणी करून प्रतिटन ३ हजार रुपये प्रमाणे ऊस पेमेंट वेळेतच शेतकऱ्यांच्या बँक खाते वर्ग केले गेले. या पुढील काळातही ज्ञानेश्वर कारखाना जास्त ऊस भाव देण्यात कायमच पुढे राहिल अशी ग्वाही लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ५२ व्या गळीत हंगामाची सांगता गुरुवारी (दि.५) सकाळी कारखान्याचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग, संचालक ऍड.देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी त्यावेळी ते बोलत होते. संचालक काकासाहेब शिंदे, काशीनाथ नवले, प्रा.नारायण म्हस्के, शिवाजीराव कोलते, मच्छिंद्र म्हस्के, बबनराव भुसारी, पंडितराव भोसले,जनार्दन कदम,सखाराम लव्हाळे,विकास नन्नवरे, अशोकराव मिसाळ, दादासाहेब गंडाळ, विष्णू जगदाळे, संतोष पावसे, सुखदेव फुलारी, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, जनरल मॅनेजर रविंद्र मोटे व्यासपीठवर उपस्थित होते. प्रांरभी अशोकराव मिसाळ व लता मिसाळ, अरुण कवडे व आरती कवडे या उभयतांच्या हस्ते विधिवत गव्हाण पूजा करण्यात आली. यावेळी बोलताना घुले पाटील म्हणाले की, सर्वांच्या सहकार्याने हंगाम अतिशय चांगला पार पडला. सहकारात ऊस गाळपात आपला कारखाना जिल्ह्यात एक नंबरवर आहे. १० लाख टन ऊस गाळप, ४ कोटी वीज निर्यात केली. या हंगामात १ कोटी ८० लाख लीटर इथेनॉल तयार करणार आहोत. आपल्या कारखान्याच्या माध्यमातून विविध कररूपाने केंद्र सरकारला ५० कोटी रुपयांचे उत्पन्न गेले आहे. कारखाना आपलाच आहे या सकारात्मक भावनेतून सर्वांनी दरवर्षी आपला ऊस ज्ञानेश्वरलाच द्यावा असे आवाहन घुले यांनी केले. कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी प्रास्ताविक भाषणात हंगामाचा आढावा घेऊन या हंगामात १० लाख ४ हजार

भातकुडगाव फाटा : ज्ञानेश्वर कारखाना आता सर्वदृष्टीने परिपूर्ण झाला असून पुढील काळात कुठलाही भांडवली खर्च नाही. वेळेत ऊस तोडणी करून प्रतिटन ३ हजार रुपये प्रमाणे ऊस पेमेंट वेळेतच शेतकऱ्यांच्या बँक खाते वर्ग केले गेले. या पुढील काळातही ज्ञानेश्वर कारखाना जास्त ऊस भाव देण्यात कायमच पुढे राहिल अशी ग्वाही लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ५२ व्या गळीत हंगामाची सांगता गुरुवारी (दि.५) सकाळी कारखान्याचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग, संचालक ऍड.देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी त्यावेळी ते बोलत होते.
संचालक काकासाहेब शिंदे, काशीनाथ नवले, प्रा.नारायण म्हस्के, शिवाजीराव कोलते, मच्छिंद्र म्हस्के, बबनराव भुसारी, पंडितराव भोसले,जनार्दन कदम,सखाराम लव्हाळे,विकास नन्नवरे, अशोकराव मिसाळ, दादासाहेब गंडाळ, विष्णू जगदाळे, संतोष पावसे, सुखदेव फुलारी, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, जनरल मॅनेजर रविंद्र मोटे व्यासपीठवर उपस्थित होते. प्रांरभी अशोकराव मिसाळ व लता मिसाळ, अरुण कवडे व आरती कवडे या उभयतांच्या हस्ते विधिवत गव्हाण पूजा करण्यात आली.
यावेळी बोलताना घुले पाटील म्हणाले की, सर्वांच्या सहकार्याने हंगाम अतिशय चांगला पार पडला. सहकारात ऊस गाळपात आपला कारखाना जिल्ह्यात एक नंबरवर आहे. १० लाख टन ऊस गाळप, ४ कोटी वीज निर्यात केली. या हंगामात १ कोटी ८० लाख लीटर इथेनॉल तयार करणार आहोत. आपल्या कारखान्याच्या माध्यमातून विविध कररूपाने केंद्र सरकारला ५० कोटी रुपयांचे उत्पन्न गेले आहे. कारखाना आपलाच आहे या सकारात्मक भावनेतून सर्वांनी दरवर्षी आपला ऊस ज्ञानेश्वरलाच द्यावा असे आवाहन घुले यांनी केले.
कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी प्रास्ताविक भाषणात हंगामाचा आढावा घेऊन या हंगामात १० लाख ४ हजार

COMMENTS