Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘दीया और बाती हम’ फेम अभिनेत्री झाली आई

मुंबई प्रतिनिधी - लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिशा परमार नुकताच आई झाली. दिशाने गोंडस परीला जन्म दिला. आता दिशाच्या पाठोपाठ आणखी एक टीव्ही अभिने

पुण्यात सायंकाळी पाचनंतर संचारबंदी
Nawab Malik यांचे अंडरवर्ल्डशी संबंध | Devendra Fadnavis यांची संपूर्ण पत्रकार परिषद (Video)
भुजबळानंतर मंत्री देसाई कोरोनाबाधित

मुंबई प्रतिनिधी – लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिशा परमार नुकताच आई झाली. दिशाने गोंडस परीला जन्म दिला. आता दिशाच्या पाठोपाठ आणखी एक टीव्ही अभिनेत्री आई झाली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री प्रियांका सिंगने मुलीला जन्म दिला. प्रियंकाने १० दिवसांपूर्वीच म्हणजे ६ सप्टेंबरला गोंडस परीला जन्म दिला पण तिने नुकताच आपल्या चाहत्यांसोबत आई झाल्याची गोड बातमी शेअर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या सहा वर्षांनंतर प्रियंका सिंग आई झाली आहे. घरी लक्ष्मीचे आगमन झाल्यामुळे प्रियंका आणि तिचे कुटुंबीय खूपच आनंदी आहेत. स्वतः अभिनेत्रीने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. ती आणि तिचे बाळ सुखरूप आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर अभिनेत्रीचे बेबी बंपसोबत फोटो व्हायरल झाले होते.

आता अचानक ती आई झाल्याची माहिती समोर आली. प्रियंका आई झाल्यामुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ६ सप्टेंबर २०२३ ला देशभरात सर्वजण कृष्णजन्माष्टमीचा उत्साह साजरा करत होते. त्याचवेळी प्रियंकाने गोंडस परीला जन्म दिला होता. प्रियंका सिंग ही भगवान कृष्णाची भक्त आहे. कृष्णजन्माष्टमीलाच मुलींचं तिच्या आयुष्यात येणं हे ती भाग्य समजते. भगवान कृष्णाने हे खास गिफ्ट दिल्याचे तिचं म्हणणं आहे. हा अनुभव खूपच खास असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे. महत्वाचे म्हणजे प्रियंकाच्या मुलीचा नामकरण विधी देखील पार पडला आहे. तिने आपल्या लाडक्या मुलीचे नाव मिका असे ठेवले आहे. पण तिला घरामध्ये राधिका म्हणून बोलवले जाते. दरम्यान, अभिनेत्री प्रियंका सिंगने दिया और बाती हम’, ‘ ‘मेरी भाभी’, ‘बडी देवरानी’, ‘संकट मोचन महाबली हनुमान, ‘श्रीमद भगवद’, ‘तेनाली रामन या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. तिने छोट्या पडद्यावर कॉमिकपासून ते सीरिअस अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रियंकाच्या सर्व भूमिकांना चाहत्यांनी चांगली पसंती देखील दिली आहे.

COMMENTS