टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी(Divyanka Tripathi) ही छोट्या पडद्यावरील टैलेंटेड अभिनेत्री आहे. चाहते त्याच्याकडे एक प्रभावी व
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी(Divyanka Tripathi) ही छोट्या पडद्यावरील टैलेंटेड अभिनेत्री आहे. चाहते त्याच्याकडे एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून पाहतात. अभिनेत्री गेल्या वर्षी ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये सहभागी झाली होती आणि या शोची फर्स्ट रनर अप ठरली होती. ‘बिग बॉस १६’ च्या लॉन्चिंगची बातमी समोर आल्यापासून दिव्यांका त्रिपाठी देखील या शोचा एक भाग असणार असल्याच्या बातम्या येत होत्या. दिव्यांकाने तिच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे.ती या शोचा भाग होणार नाही. अशी माहिती तिने दिले आहे.

COMMENTS