Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांग कल्याण अभियान दिव्यांगांच्या दारी जिल्ह्यात अद्याप अभियानाचा प्रारंभ नाहीच

आष्टी प्रतिनिधी - शासन आपल्या दारी हा शासनाचा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांना सर्व शासकीय योजनेचा लाभ एकाच छताखाली देण्याकरिता सद्यस्थितीत शासनाने

ठाकरेसेना नसून शिल्लकसेना
केज शहरातील शांताबाई तापडीया पब्लिक स्कुल मध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
अदानी ग्रुपला मोठा फटका

आष्टी प्रतिनिधी – शासन आपल्या दारी हा शासनाचा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांना सर्व शासकीय योजनेचा लाभ एकाच छताखाली देण्याकरिता सद्यस्थितीत शासनाने राबवला आहे.या उपक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तींचेही स्वावलंबन व पुनर्वसन करण्याकरिता शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने दिनांक 23/05/2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करून दिव्यांग कल्याण अभियान दिव्यांच्या दारी हा उपक्रम राबवण्याचे निर्देश सर्व शासकीय प्राधिकरणास दिले आहेत.म्हणून दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणुन त्यांचा सर्वांगीण विकास शीघ्र गतीने व्हावा हा प्रमुख हेतू शासन निर्णय निर्गमित करण्यामागील निर्धारित आहे.परंतु या शासन निर्णयाची बीड जिल्हा प्रशासनाने दिव्यांग कल्याण अभियान दिव्यांगांच्या दारी राबविण्याबाबत कोणतेच व्यापक प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. परंतु या शासन निर्णयाची आष्टी येथील लोकप्रिय व संवेदनशील आमदार श्रीयुत सुरेश धस यांनी गंभीर दखल घेऊन तालुकास्तरीय शासन आपल्या दारी आष्टी येथे अभियानाचा प्रारंभ करुन शासन निर्णयाची अंमलबजावणी करुन जिल्हा प्रशासनासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे.म्हणून सुरेश धस यांच्या कार्याचा जिल्हा प्रशासनाने आदर्श घेऊन जिल्ह्यात जिल्हास्तरीय दिव्यांग कल्याण दिव्यांगांच्या दारी अभियानाचा तात्काळ प्रारंभ करावा.नसता दिव्यांग कल्याण दिव्यांगांच्या दारी अभियान प्रारंभ करण्यास कुचराई व दिरंगाई करणार्या जिल्हा प्रशासनातील जबाबदारी निर्धारित केलेल्या अधिकार्यांविरुद्ध विधानसभा, विधानपरिषद सभागृहात पावसाळी अधिवेशन कालावधीत लक्षवेधी / तारांकीत प्रश्न उपस्थित करून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी अशा अधिकार्यांविरुद्ध दिव्यांग व्यक्तींप्रती अनास्था दाखवल्या प्रकरणी शिस्तभंग / निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित करावी या स्वरूपाची लेखी तक्रार शासन मान्यता प्राप्त दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींकडे थेट ई-मेल द्वारे केली आहे.अशी माहिती दिव्यांग व्यक्तींच्या हितार्थ प्रसिद्धीपत्रकान्वय आठवले यांनी दिली आहे.

COMMENTS