Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिवंगत पिनु शिंदे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे टाकले जि प सदस्य अशोक लोढा

मुलीच्या नावाने केली एक लाख रुपयांची एफ डी

बीड प्रतिनिधी - स्वतःची परिस्थिती प्रतिकूल असतानाही कायम इतरांच्या मदतीसाठी प्रसन्नमुद्रेने धावून जाणारा बालाघाटावरील तरुण अर्जुन उर्फ पिनु शिंद

डॉक्टर्स डे निमित्ताने सावळेश्वर येथे आरोग्य शिबीराचे आयोजन
प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी अविनाश निंभोरे
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे ः भानुदास मुरकुटे

बीड प्रतिनिधी – स्वतःची परिस्थिती प्रतिकूल असतानाही कायम इतरांच्या मदतीसाठी प्रसन्नमुद्रेने धावून जाणारा बालाघाटावरील तरुण अर्जुन उर्फ पिनु शिंदे यांचा गत दोन वर्षांपूर्वी कोरोनाने मृत्यू झाला. अल्पभूधारक असलेल्या या कुटुंबीयाला उदरनिर्वाहाचे फारसे  साधन नाही. अशा स्थितीत पिनु शिंदे यांच्या सहावीत शिक्षण घेणार्‍या मुलीच्या नावाने जि.प. सदस्य अशोक लोढा यांनी एक लक्ष रुपयांची एफडी बँकेत जमा केली. या एफडीचे कागदपत्रे बुधवारी अंजनवती (ता. बीड) येथे अशोक लोढा यांनी कु. श्रावणी अर्जुन शिंदे हिच्याकडे सुपूर्द केले. यावेळी शिंदे कुटुंबीय उपस्थित होते.
बीड तालुक्यातील अंजनवती येथील रहिवासी असलेला अर्जुन उर्फ पिनु शिंदे हा तरुण मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय होता. अगदी लहानपणापासूनच पिनु शिंदे यांना सामाजिक कार्याची आवड. अत्यंत प्रेमळ स्वभाव आणि सर्वांच्या मदतीला धावून जाण्याची असलेली तळमळ यामुळे पिनु शिंदे हे सर्व दूर परिचित व्यक्तिमत्व होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी चौसाळा येथील ज्येष्ठ नेते विलास महाराज शिंदे यांच्यासह बाळासाहेब मोरे तसेच गेले काही वर्षांपासून शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्या समवेत सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग नोंदवला. राजकारणात राहून शक्य होईल तितकी सर्वसामान्यांची कामे करत राहणे कधीही कुणाबद्दल तक्रार नसणे या त्यांच्या स्वभावामुळे पिनू शिंदे यांनी अनेकांची मने जिंकली होती.  2021 मध्ये कोरोनाने हा उमदा तरुण काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांचा आधार हरपला. पिनु शिंदे यांच्या पाश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई भाऊ असा परिवार आहे. या परिवाराला काही ना काही मदत आपल्याकडून व्हावी या उदात्त हेतूने चौसाळा जि.प. गटाचे सदस्य अशोक लोढा यांनी पिनु शिंदे यांची कन्या कुमारी श्रावणी हिच्या नावे एक लक्ष रुपयांची एफडी तयार केली. आता ती अठरा वर्षाची झाल्यानंतर ती रक्कम कुटुंबाच्या कामी येणार आहे. बुधवारी अंजनवती येथे अशोक लोढा यांनी श्रावणीच्या हाती फिक्स डिपॉझिट अर्थात एफडीची कागदपत्रे सोपवली. यावेळी शिंदे कुटुंबासह सुरेश महाराज जाधव, भाऊसाहेब शिंदे, राम शिंदे, कैलास येडे,वैभव येडे, संतोष नाईकवाडे आदींसह अंजनवती येथील जेष्ठ नागरिक उपस्थित होते. अशोक लोढा यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

COMMENTS