अहमदनगर (प्रतिनिधी)- रविवारी दि.२६ मार्च रोजी अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, मुले
अहमदनगर (प्रतिनिधी)– रविवारी दि.२६ मार्च रोजी अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, मुले व मुली अशा दोन वेगवेगळ्या गटात स्पर्धेचे आयोजन केले आहे.
अहमदनगर येथील नागर महाजन वाडी कार्यालय जुन्या कापड बाझार, येथे सदरील स्पर्धेचे आयोजन केले असून रविवार दी. २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता पहिल्या फेरीचे उद्घाटन केले जाईल. एप्रिल महिन्यात बुलढाणा येथे नियोजित १७ वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धेकरिता अहमदनगर जिल्ह्याचा मुले व मुलींचा संघ या स्पर्धेतून निवडण्यात येणार आहे. अंतिम निकाल प्रत्रिके प्रमाणे २ मुले व २ मुलींच्या गटातून प्रथम २ खेळाडू (एकूण ४ खेळाडू) राज्यस्तरावर पाठविण्यात येतील. जिल्ह्यातून निवड झालेल्या खेळाडूंची राज्य निवड चाचणी स्पर्धेची प्रवेश फी,रू १०००/- संघटनेमार्फत भरली जाईल व तेथे राहण्याची व्यवस्था सुद्धा केली जाईल तसेच पहिल्या पाच खेळाडूंना आकर्षक करंडक देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदरील स्पर्धा १७ वर्षांखालील सर्वां खेळाडूं साठी खुली असून खेळाडूंनी येताना बुद्धिबळ पट, सोंगट्या, जेवणाचा डबा व पिण्याचे पाणी आणावे. सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रवेश ऑनलाईन किंवा व्हाट्सअप वर स्वीकारले जाणार आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्याकरिता अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना प्रयत्नशील असून अहमदनगर जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी उत्फुर्तपणे स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी केले आहे. प्रवेश नोंदणी करता व अधिक माहितीकरिता यशवंत बापट सर ९३२६०९२५०१, पारूनाथ ढोकळे सर ९८५०७०४२६८, मनीष जसवाणी सर ८८५५००२३३३, यांना संपर्क साधावा असे अवाहन अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने केले आहे………..
COMMENTS