Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जि.प., लातूर पं. स. च्या मुल्यांकनाची तपासणी

लातूर प्रतिनिधी - यशवंत पंचायत राज अभियानात विभागीय स्तराच्या स्व: मुल्यांकणाच्या तपासणीत प्रथम येण्याचा ठसा उमठवत लातूर पंचायत समिती व लातूर जिल

सावित्री नदीत बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू
फडणवीसांना गुलाल लागू देणार नाही
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरण सुरू

लातूर प्रतिनिधी – यशवंत पंचायत राज अभियानात विभागीय स्तराच्या स्व: मुल्यांकणाच्या तपासणीत प्रथम येण्याचा ठसा उमठवत लातूर पंचायत समिती व लातूर जिल्हा परिषद राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्र ठरली होती. विभागीय आयुक्त नियुक्त धुळेच्या राज्यस्तरीय पथकाने लातूर पंचायत समितीची व लातूर जिल्हा परिषदेच्या स्व: मुल्यांकणाची पुन्हा सोमवारी तपासणी केली आहे. विभाग स्तरीय प्रमाणेच राज्य स्तरावर देखील लातूर पंचायत समिती व लातूर जिल्हा परिषद आपल्या कार्याची छाप पाडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यशवंत पंचायत राज अभियान 2021-22 साठी लातूर जिल्हयातील 10 पंचायत समित्या व लातूर जिल्हा परिषदेने तयारी सुरू केली होती. या वर्षापासून 400 गुणांचे मुल्यांकण ग्रा धरले आहे. 10 पंचायत समित्यांनी कामकाजाच्या संदर्भाने 400 गुणांचे मुल्यांकण जि. प. लातूरकडे पाठवले होते. लातूर जि.प.ने लातूर जिल्हा परिषदेच्यासह पहिल्या आघाडीच्या प्रथम दोन पंचायत समितींचा अहवाल छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता. सदर गुणांकनानुसार पात्र ठरलेल्या लातूर पंचायत समिती, जळकोट पंचायत समिती व लातूर जिल्हा परिषदेच्या स्व मुल्यांकणाच्या तपासणीसाठी छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त यांनी नियुक्त केलेल्या धाराशिव जि. प. च्या पथकाने तपासणी केली. या तपासणीत लातूर पंचायत समिती व लातूर जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर विभागात प्रथम आली. विभात प्रथम आलेली जिल्हा परिषद व जिल्हयात पहिली आलेली पंचायत समिती यांच्या स्वमुल्यांकणाच्या तपासणीसाठी नाशिक विभागीय आयुक्तांनी नियुक्त केलेल्या पथकात जि. प. धुळेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी ऐ. जे. तडवी यांचा समावेश होता. या पथकाने लातूर जिल्हा परिषदेच्या 14 विभागातील 2021-22 च्या कालावधीतील कामकाजाच्या गुणांकणाची तपासणी केली. तसेच या पथकाने लातूर पंचायत समितीच्या गुणांकणाच्या संदर्भाने कामकाजाची तपासणी केली.

COMMENTS