Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा बँक मातृसंस्था म्हणून जिल्ह्याच्या विकासात पाठीशी : माजी मंत्री थोरात

संगमनेर : सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार चळवळ बळकट करण्याबरोबर पीक कर्जाच्या माध्यमातून जिल्हा बँकेने शेतकरी उभा केला. 11 हजार कोटींच्या ठेवी हे जनतेच्या विश्वासाचे मोठे प्रतीक असून जिल्ह्याच्या विकासात मातृसंस्था म्हणून बँक कायम पाठीशी उभी राहिली असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संगमनेर शाखेच्या तालुका विकास अधिकारी कार्यालयाचा नूतनीकरण उद्घाटन समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले हे होते तर व्यासपीठावर व्हा.चेअरमन ऍड.माधवराव कानवडे, दुर्गा तांबे, रणजीतसिंह देशमुख, पांडुरंग पाटील घुले, बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, बाळासाहेब साळुंखे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सभागृह नूतनीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले असून जिल्ह्यातील विकासातून झालेल्या बदलाच्या पाठीशी जिल्हा बँक कायम मातृ संस्था म्हणून उभी राहिली आहे. या बँकेमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 44 वर्ष संचालक म्हणून काम करताना व्हा. चेअरमन व चेअरमन या पदावर 18 वर्ष काम केले. संगमनेर शाखेच्या या इमारतीचे भूमिपूजन माझे आजोबा संतोजी थोरात यांच्या हस्ते 29 जुलै 1976 रोजी झाले. पन्नास वर्षाच्या या कार्यकालमध्ये मोठा बदल झाला असून बँकेने शेतकऱ्यांचा मोठा विश्वास संपादन केला आहे .आणि त्यामुळे जिल्हा बँकेत 11000 कोटींच्या ठेवी बँकेमध्ये आहेत.   चंद्रशेखर घुले म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व स्वर्गीय मारुतराव घुले यांचा स्नेहबंध कायम राहिला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याने कायम राज्याला दिशा दिली आहे. बँकेने नव्याने 8 टक्के व्याजाने सोनेतारण कर्ज सुरू केले असून आगामी काळामध्ये जिल्ह्याच्या सर्व सोसायट्यांच्या माध्यमातून किंवा आर कोड राबवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी 17 कोटींचा निधी
शेकडो विद्यार्थ्यांनी अभ्यासला संगमनेरचा समृद्ध सहकार
मीच “मुख्यमंत्री” आहे हे एकनाथ शिंदेंनी सिद्ध करावे.

संगमनेर : सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार चळवळ बळकट करण्याबरोबर पीक कर्जाच्या माध्यमातून जिल्हा बँकेने शेतकरी उभा केला. 11 हजार कोटींच्या ठेवी हे जनतेच्या विश्वासाचे मोठे प्रतीक असून जिल्ह्याच्या विकासात मातृसंस्था म्हणून बँक कायम पाठीशी उभी राहिली असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संगमनेर शाखेच्या तालुका विकास अधिकारी कार्यालयाचा नूतनीकरण उद्घाटन समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले हे होते तर व्यासपीठावर व्हा.चेअरमन ऍड.माधवराव कानवडे, दुर्गा तांबे, रणजीतसिंह देशमुख, पांडुरंग पाटील घुले, बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, बाळासाहेब साळुंखे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सभागृह नूतनीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले असून जिल्ह्यातील विकासातून झालेल्या बदलाच्या पाठीशी जिल्हा बँक कायम मातृ संस्था म्हणून उभी राहिली आहे. या बँकेमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 44 वर्ष संचालक म्हणून काम करताना व्हा. चेअरमन व चेअरमन या पदावर 18 वर्ष काम केले. संगमनेर शाखेच्या या इमारतीचे भूमिपूजन माझे आजोबा संतोजी थोरात यांच्या हस्ते 29 जुलै 1976 रोजी झाले. पन्नास वर्षाच्या या कार्यकालमध्ये मोठा बदल झाला असून बँकेने शेतकऱ्यांचा मोठा विश्वास संपादन केला आहे .आणि त्यामुळे जिल्हा बँकेत 11000 कोटींच्या ठेवी बँकेमध्ये आहेत. 

 चंद्रशेखर घुले म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व स्वर्गीय मारुतराव घुले यांचा स्नेहबंध कायम राहिला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याने कायम राज्याला दिशा दिली आहे. बँकेने नव्याने 8 टक्के व्याजाने सोनेतारण कर्ज सुरू केले असून आगामी काळामध्ये जिल्ह्याच्या सर्व सोसायट्यांच्या माध्यमातून किंवा आर कोड राबवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS