Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलवाडा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

तलवाडा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तलवाडा या ठिकाणी पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना शालेय समिती पदाधिकारी तसेच

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्याचं निधन
नियमबाह्य रीतीने चालविण्यात येत असलेले  दारूचे दुकान तात्काळ बंद करा
थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार वितरित 

तलवाडा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तलवाडा या ठिकाणी पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना शालेय समिती पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीत चांगल्या दर्जेदार गणवेश वाटप करण्यात आला आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा या ठिकाणी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत शासकीय कुठल्या शाळेने गणवेशाचे वाटप केले नसून शाळेतील मुख्याध्यापक विजय डोंगरे सर यांनी यासाठी मोठे परिश्रम घेऊन लवकरात लवकर गणवेशासाठी आलेला निधी खर्चून विद्यार्थ्यांना चांगल्या व दर्जेदार गणवेशाचे वाटप कसे करता येईल यासाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले असून शालेय समितीच्या सर्व पदाधिकारी बोलून गणवेश वाटपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला यावेळी माजी वरिष्ठ लेखाधिकारी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य बळीराम शिंदे, मुख्याध्यापक विजय डोंगरे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन पखाले, उपाध्यक्ष शेख रहीम भाई, सदस्य सुमेध करडे,हरी अंकुश, पर्यवेक्षक जायभाय सर, टी बी जाधव, खेडकर सर ,खेत्रे सर, सगळे सर, गव्हाणे सर, शेळके मॅडम, हंबर्डे मॅडम, बंडे सर ,मारुती डोंगरे सर,जाधव बी.के., काळे सर, गुळवे सर, राठोड सर, पी एस राठोड सर, मुसळे सर, हतागळे लिपिक यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पाडण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडे सर यांनी केले तर आभार गव्हाणे सर यांनी माडले

COMMENTS