Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवासा दुय्यय कारागृहात मिठाई वाटप

दिवाळी निमित्त तहसीलदार व जेलर यांचा आदर्शवत उपक्रम.

भालगाव प्रतिनीधी - जन्मताचं कोणी गुन्हेगार नसतो काही जण प्रसंग अवधान गुन्हेगार बनतात तर काहीजणांना परिस्थिती भाग पाडते व माणूस हा चुकतोच त्याल

कलियुगात पुण्यकर्मच महत्वाचे ः परमानंदगिरी महाराज
नाटेगावातील शेतकर्‍यांचे उपोषण मागे
संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामीण विद्यार्थी बनताहेत कुटुंबांचा आधार

भालगाव प्रतिनीधी – जन्मताचं कोणी गुन्हेगार नसतो काही जण प्रसंग अवधान गुन्हेगार बनतात तर काहीजणांना परिस्थिती भाग पाडते व माणूस हा चुकतोच त्याला समजून घेणे धीर देणे हि मानवी वृत्ती आहे कारागृहात आल्यानंतर कैद्यांची मानसिकता बदलली तर आत्मिक समाधान वाटते हिच वृत्ती जोपासत आज दिवाळी  नेवासा दुय्यय कारागृहात दिवाळी निमित्त कैद्यांना फराळ वाटप करण्यात आले 
तहसीलदार श्री रुपेश कुमार सुराणा व पोलीस उपनिरीक्षक  श्री गावंडे, यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले कैद्यांना दिवाळी निमित्त फराळ व मिठाई वाटप कार्यक्रम  हा अभिनव उपक्रम सब जेलर श्री उत्तमरावं रासकर यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात आला होता 
यावेळी तहसीलदार श्री रुपेश कुमार सुराणा बोलताना म्हणाले की कारागृहात कैद्यांनी दिवाळी सण साजरा करावा घरच्या प्रमाणे इथेही गोड पदार्थ फराळ त्यांना भेटावे त्यांची मानसिकता बदलालावी , या विचारातून आज फराळ वाटप कार्यक्रम आम्ही घेतला आहे या आगळ्या वेगळ्या उपक्रमातुन त्यांची मानसिकता बदलेल हे नक्की 
यावेळी कारागृहातील महिला कैदी व पुरुष कैद्यांन कडून तहसीलदार, जेलर, पोलीस, भत्ता वाढी , सर्वांचे आभार व्यक्त करून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या व दिवाळीचा आनंद उत्स्फूर्त पणे साजरा करण्यात आला  यावेळी नेवासा दुय्यय कारागृहाचे जेलर श्री उत्तमरावं रासकर, पोलीस उपनिरीक्षक श्री गावंडे ,पोलीस हवालदार  श्री कांबळे , पोलीस हवालदार श्री साळवे, पोलीस नाईक  श्री कुदळे,  पोलीस कॉन्स्टेबल श्री दहिफळे, भत्ता चालक  श्री योगेश गायकवाड,आदी उपस्थित होते.  आज तहसीलदार साहेब व जेलर साहेबांनी दिवाळी निमित्ताने मिठाई व फराळ वाटप केली आम्ही कधी विचार पण नव्हता केला जेल मध्ये असताना आम्ही दिवाळी साजरी करू म्हणून सर्वांचे मनःपूर्वक आभार यावेळी कैद्यांनी वेक्त केले 

COMMENTS