Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांना उसाच्या बेण्याचे वितरण

सिंजेटा फाऊडेशन व र्ग्रिकल्चर इंत्रेप्रेन्युअर ग्रोथ फाउंडेशनचा पुढाकार

देवळाली प्रवरा ः राहुरी, राहता व श्रीरामपूर तालुक्यातील ऊसाचे आगार असल्याने येथिल शेतकर्‍यांना ऊसाची नवीन जातीचे बेणे वापरुन ऊसाची लागवड करावी या

निळवंडेचे खुले कालवे व चार्‍या लाभक्षेत्रासाठी वरदान ः विलास गुळवे
पंढरपूर मतमोजणी आकडेवारीमध्ये तफावतीचा आरोप
सोनईमध्ये पाळला कडकडीत बंद

देवळाली प्रवरा ः राहुरी, राहता व श्रीरामपूर तालुक्यातील ऊसाचे आगार असल्याने येथिल शेतकर्‍यांना ऊसाची नवीन जातीचे बेणे वापरुन ऊसाची लागवड करावी यासाठी सिंजेटा फाऊडेशन व र्ग्रिकल्चर इंत्रेप्रेन्युअर ग्रोथ फाउंडेशने पुढाकार घेतला असून 125 शेतकर्‍यांना प्रात्यक्षिकासाठी उसाच्या 15012 या नवीन वाणाचे वितरण जि.प माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सिंजेटा फाउंडेशन व आग्रिकल्चर इंत्रप्रेन्युअर ग्रोथ फाउंडेशन यांनी पर्यावरण संरक्षण निधी प्रकल्प अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पासाठी कार्यरत असणारे कृषी मार्गदर्शक, अक्षय चेडे, पूनम खाडे, नामदेव गव्हाणे व किरण कंक यांनी प्रत्यक्ष शेतकर्‍यांशी संवाद साधुन नवीन वाणाचा शेतकर्‍यांना लाभ मिळावा.
       राहुरी, राहता व श्रीरामपुर तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे मुख्यतः ऊस उत्पादक आहेत. येथील शेतकर्‍यांसाठी ईडिएफ प्रकल्प अंतर्गत हा कार्यक्रम पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना येथे घेण्यात आला. कार्यक्रमासाठी जि.प.माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते 125 शेतकर्‍यांना उसाच्या बेण्याचे वाटप करण्यात आले. सिजेंटा फाउंडेशन इंडियाचे प्रकल्प समन्वयक पवन थोरात यांनी 15012 सेंट्रल शुगरकेन रिसर्च स्टेशन (एमपीकेवी), पडेगाव ऊस संशोधन केंद्रा अंतर्गत विकसित केलेला वाण या वाणाच्या विशेष गुणधर्मा बद्दल माहिती दिली. ऊसाची नवीन जात पुढील काळात शेतकर्‍यांना अधिक उत्पन्न मिळून देईल. असे त्यांनी सांगितले. पर्यावरण संरक्षण निधी प्रकल्प अधिकारी डॉ. गजानन राजुरकर यांनी हवामान पूरक शेती या बद्दल माहिती दिली. व प्रकल्प समन्वयक बबलू परसुवाले यांनी सिजेंटा फाउंडेशन इंडिया बद्दल माहिती दिली. डॉ.योगेश थोरात व डॉ.ज्ञानेश्‍वर बोरसे यांनी जैविक नियंत्रण कसे करावे याबद्दल शेतकर्‍यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार सुञसंचालन पवण थोरात  व आभार प्रदर्शन अक्षय चेडे  यांनी केले.

COMMENTS