लातूर प्रतिनिधी - लातूर येथील सारोळा रोड वरील महात्मा गांधी कृष्ठधाम सोसायटीत राहणा-या गोरगरीब लोकांना लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निम
लातूर प्रतिनिधी – लातूर येथील सारोळा रोड वरील महात्मा गांधी कृष्ठधाम सोसायटीत राहणा-या गोरगरीब लोकांना लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव यांच्या वतीने 100 कुटुंबांना फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, काँग्रेस माध्यम सेलचे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, नारायण आंबेकर, प्रा. शशिकांत कदम यांच्या हस्ते गोरगरीब लोकांना फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
लोकनेते विलासराव देशमुख यांनी या भागातील कृष्ठधाम मधील लोकांना वेळोवेळी सहकार्य केले आहे. त्यातील अनेक जणांनी आम्हाला इथ खूप मोठा आधार देण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांनी केले आहे. आज त्यांची आठवण येते असेही ते यावेळी म्हणत साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
COMMENTS