Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

न्यू मानस गुरुकुलात लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य वाटप…!

युवा पत्रकार अंकुश गवळी व लहु गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

बीड प्रतिनिधी - बीड शहरातील न्यू मानस गुरुकुल या ठिकाणी आदर्श देवगाव या गावचे भूमिपुत्र तथा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषद वडवणी तालुका सचिव ,

जामखेड तालुक्यातील तीन रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण
नगरमध्ये विकले जाते नकली रेमन्ड कापड…गुन्हा दाखल
पंजाबमध्ये मुख्यमंत्री चन्नी यांच्या निकटवर्तीयावर ईडीचे धाडसत्र

बीड प्रतिनिधी – बीड शहरातील न्यू मानस गुरुकुल या ठिकाणी आदर्श देवगाव या गावचे भूमिपुत्र तथा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषद वडवणी तालुका सचिव ,युवा पत्रकार अंकुश गवळी व लहू गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरातील न्यू मानस गुरुकुल या ठिकाणी, लढा दुष्काळाशी फाउंडेशन तथा तीगावचे विद्यमान सरपंच अँड. राज पाटील यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यू मानस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप याप्रसंगी स्पेन्सिल, खोडरबर, पेन, वही इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच राज पाटील आपल्या मनोगत भाषणात म्हणाले की विद्यार्थ्यांनो आई-वडिलांचा चेहरा डोळ्यापुढे ठेवून आयुष्याची वाटचाल करावी. अंकुश गवळी आणि लहू गवळी यांनी आपल्या आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून मोठ्या जिद्दीने आपली वाटचाल केली आहे अंकुश गवळी यांनी पत्रकारिता मध्ये नावलौकिक करताना सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे तर लहू गवळी यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये चांगले काम केले आहे असे प्रतिपादन राज पाटील यांनी केले. तर  वडवणी येथील ख्यातनाम पत्रकार तथा पिंपरखेडचे उपसरपंच अशोक आप्पा निपटे, देवगावचे ग्रामपंचायत सदस्य राहुल सुरवसे, पुसरा येथील सरपंच विलास सावंत, न्यू मानस गुरुकुलचे संचालक दीपक सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार, जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र गाडेकर, पत्रकार नितीन उपाध्याय, युवा मल्हार सेनेचे राजू शिंदे, अविनाश आमटे, अमर वाघमोडे, पवन माने, शुभम सपकाळ यांनीही यावेळी पत्रकार अंकुश गवळी आणि लहू गवळी यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमासाठी न्यू मानस गुरुकुलचे शेकडो विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. चौकट. ग्रामीण शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना प्रेरणा देण्याची गरज पत्रकार अंकुश गवळी आणि लहू गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या वतीने न्यू मानस गुरुकुलच्या सर्व विद्यार्थ्यांना यावेळी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हे साहित्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाला गती देईल अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

COMMENTS