बुलडाणा प्रतिनिधि - अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था बुलढाणा द्वारा संचलित मूकबधिर निवासी विद्यालय, अपंग निवासी विद्यालय,व अंध निवासी विद्यालयातील

बुलडाणा प्रतिनिधि – अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था बुलढाणा द्वारा संचलित मूकबधिर निवासी विद्यालय, अपंग निवासी विद्यालय,व अंध निवासी विद्यालयातील मुला-मुलींना,धाड पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले नाईक पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बाबुराव हावरे व पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा येथे सुरक्षा शाखेत कार्यरत असलेल्या रेखा ईश्वर हावरे यांची एकुलती एक कु.ओवी ईश्वर हावरे हिच्या द्वितीय वाढदिवसा निमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना १३० लोवर, टि शर्ट आणि १३ सलवार कुर्ता असे १४३ ड्रेस वाटप केले. या वेळी संस्थेचे सचिव जयसिंह जयवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री एंडोले, तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तर हावरे कुटुंबियांच्या वतीने वाढदिवस असो की इतर कार्यक्रम हे कुठलाही बडेजाव किँवा बॅनर छापून, किंवा पैशाचा अपव्यय करुण केल्या जात नाही,ते नेहमीच सामाजिक उपक्रमात सहभाग घेतात, गोर गरीब गरजूंना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात, तर कु. ओवी चा पाहिला वाढदिवस सुध्दा सामाजिक उपक्रमाने म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे नवजात बालकांना कपडे वाटप करुण साजरा करण्यात आला होता.त्यामुळें हावरे कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचा इतरांनी आदर्श घ्यावा.
COMMENTS